Thursday, April 25, 2024

अमृता फडणवीसांच ‘मूड बना लिया’ गाण्याने घातलाय धुमाकूळ! पोस्ट शेअर करत म्हणाल्या, ‘जल्लोष संपण्याचं…,’

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमृता फडणवीस यांच नुकतंच नवीन गाणं ‘मूड बना लिया‘ प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. सोशल मीडियावर या गाण्याने क्रेज मिळवला आहे. या गाण्याला युट्युबवर 30 मिलियनपेक्षाही जास्त व्ह्युज मिळाले आहेत. त्यामुळे अमृताजींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्याशिवाय अमृताजींनी स्वत: या विषयी माहिती देत गाण्याची सक्सेसपार्टी देखिल ठेवली आहे.

अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांचं नुकतंच गाणं ‘मूड बना लिया’ प्रेक्षकांच्या भेटीस आलं असून चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अमृतजींनी गाण्याच्या सक्सेससाठी एक पार्टी ठेवली होती. ज्यामध्ये त्यांना गाण्याबद्दल माहिती दिली असून पार्टीचे काही फोट देखिल शेअर केले आहेत. युट्युबवर या गाण्याला 30 मिलियन पेक्षाही जास्त व्हि्युज मिळाले आहेत.

यापूर्वी देखिल अमृताजींनी ट्वीटरवर #मूड बना लिया गाण्यावर डान्स स्पर्धादेखिल सुरु केली होती. त्यांनी स्वत: या गाण्यावर डान्स करत व्हिडिओ शेअर केला होता आणि ट्वीटरवरुन लोकांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची मागणी केली होती. त्याशिवाय त्यांनी व्हिडिओ शेअर करत लिहिले होते की, “जल्लोष संपण्याचं नावच घेत नाही, कारण मूड बना लिया या गाण्याने 30 मिलियन व्यूजचा टप्पा पार केला आहे.” त्याशिवाय त्यांनी सपोर्टिंग टिमचेही आभार मानले आहेत.

अमृता फडणवीसांच मूडबनलेया हे गाणं (दि, 6 जानेवारी) रोजी प्रदर्शित झालं होतं. आतापर्यत या गाण्याला 50 मिलियन पेक्षाही जास्त व्युज मिळाले असून अनेक चाहते या गाण्यावर रिल व्हिडिओ बनवून शेअर करत आहेत. त्याशिवाय अमृताजींनी पार्टीतले काही फोटो शेअर केले आहे ज्यामध्ये त्या खूपच सुंदर दिसत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आदिलसोबत लग्नावर राखी सावंतने ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली, ‘मी खूप….’
‘आई कुठे काय करते’ मालिकेला तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मिलिंद गवळी यांनी शेअर केली भावनिक पोस्ट

हे देखील वाचा