Thursday, April 18, 2024

“मोदीजी हे जगातील एकमेव अद्भूत नेते” अमृता फडणवीस यांची ‘मन की बात’च्या १०० व्या भागाबद्दल केलेली पोस्ट व्हायरल

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी आकाशवाणीवर ‘मन की बात’ हा कार्यक्रम सुरु केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधत, त्यांनी आणलेल्या योजना, त्यांच्या समस्या या आणि इतर अनेक गोष्टीबद्दल चर्चा करतात. त्यांचा हा कार्यक्रम तुफान गाजत असतो. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी ते ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतात. पंतप्रधान मोदींच्या या कार्यक्रमाचे लोकांसोबतच अनेक नेते मंडळी देखील कौतुक करताना दिसतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या या शोवर जनता देखील भरभरून कौतुकाचा वर्षाव करतात. नुकताच त्यांनी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात च्या १०० व्या भागात देखील जनतेशी संवाद साधला. या भागात देखील त्यांनी काही खास लोकांशी संवाद साधला.

नुकत्याच झालेल्या या मन की बात कार्यक्रमाचे कौतुक अमृता फडणवीसने देखील केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असलेल्या गायिका अमृता फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांच्या आणि त्यांच्या मुलीचा फोटो पोस्ट केला असून, त्या पंतप्रधान मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम लेकीसह ऐकताना दिसत आहे. याच्याशीच संबंधित एक पोस्ट त्यांनी शेअर करत मोदी यांचे कौतुक केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

अमृता यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “दिविजासोबत मी ‘मन की बात’चा आजचा ऐतिहासिक १०० वा भाग पाहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे जगातील एकमेव असे अद्भूत नेते आहेत ज्यांनी ‘मन की बात’च्या माध्यमातून कोट्यावधी लोकांच्या भावना व्यक्त केल्या आणि त्याद्वारे अनोळखी लोकांना देखील ओळख मिळवून दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या कार्याला सलाम”.”

दरम्यान अमृता यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या मताला योग्य म्हटले आहे. पीएम मोदींचा मन की बात हा कार्यक्रम पहिल्यांदा ३ ऑक्टोबर २०१४ रोजी प्रसारित झाला होता. ऑल इंडिया रेडिओ ते रेकॉर्ड करून नंतर प्रसारित करते. आकाशवाणी आणि दूरदर्शन व्यतिरिक्त खाजगी वाहिन्यांनीही त्याचे प्रसारण केले. हा कार्यक्रम भाषांमध्ये प्रसारित केला जातो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘भारतात समस्या…मात्र दुबईत मी सुरक्षित’ जीवे मारण्याच्या धमक्यावर सलमान खानने सोडले मौन

पहिलाच चित्रपट ठरला हिट, तर पुढे तिन्ही खानसोबत काम करायची मिळवली तिने सुवर्णसंधी; वाचा अनुष्का शर्माचा यशस्वी जीवनप्रवास

हे देखील वाचा