Thursday, April 18, 2024

‘भारतात समस्या…मात्र दुबईत मी सुरक्षित’ जीवे मारण्याच्या धमक्यावर सलमान खानने सोडले मौन

सध्या सगळीकडेच सलमान खान आणि सलमान खान हाच दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा बहुप्रतिक्षित असा किसी का भाई किसी की जान सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा जरी सरासरी प्रतिसाद मिळत असला तरी, सिनेमाने १०० कोटी कमावले आहेत. सिनेमाच्या प्रदर्शनाआधी देखील फक्त सलमानच्याच बातम्या मीडियामध्ये गाजत होत्या. याचे कारण म्हणजे सलमानला लॉरेन्स बिश्नोईंने त्याला दिलेली जीवे मारण्याची धमकी. या विरोधात त्याने पोलिसांमध्ये तक्रार देखील केली आहे. आता त्याने त्याला मिळालेल्या या धमकीवर प्रतिक्रिया दिली आहे.

सलमान खानला मुंबई पोलिसांनी Y+ सुरक्षा दिली असून, तो देखील त्याच्या सुरक्षेबाबत सतर्क असतो. दुबईमध्ये आयोजित एका मुलखातीमध्ये सलमान खानने त्याच्या सुरक्षेबद्दल वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, आता रस्त्यावर एकट्याने सायकल चालवणे देखील शक्य होत नाही. यासोबतच तो म्हणाला, त्याला या धमक्यांची भीती वाटत नाही. तो सध्या दुबईमध्ये पूर्ण सुरक्षित आहे. भारतात त्याला समस्या आहे. त्याला जे काही करायला सांगितले ते तो करत आहे. या सर्व गोष्टींबाबत तो खूपच सतर्क आहे.

दरम्यान सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईंने बिकानेरमधील त्यांच्या समाजाच्या मंदिरात येऊन माफी माग नाहीतर जीवे मारू अशी धमकी दिली आहे. सलमान खानने काळवीट हत्या केल्यामुळे बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याच्या रागातून लॉरेन्सने ही धमकी दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्याला मोठी सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

दरम्यान सलमान खानच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर तो लवकरच यशराजच्या ‘टायगर 3’ मध्ये दिसणार असून, सोबतच तो ‘टाइगर वर्सेज पठाण’मध्ये देखील शाहरुख खानसोबत दिसणारा आहे. ‘टायगर 3’ यावर्षीच प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुराग बसूने कंगनाला दिली ‘अशी’ ट्रेनिंग, इंडस्ट्रीत 17 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनेत्रीला आठवले जुने दिवस

सलमान खान लग्नासाठी नाही, तर मुलासाठी करतोय प्लॅनिंग; म्हणाला, ‘कायदा बदलला नाही, तर…’

हे देखील वाचा