मराठीमध्ये आजकाल अनेक नवीन चित्रपट येत आहेत. त्यामुळे कलाकार देखील त्यांच्या चित्रपटांचे प्रमोशन करण्यात कुठेच कमी पडताना दिसत नाहीत. अशातच अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांचा ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लवकरच सिनेमा गृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची मागील अनेक महिन्यनापासून चर्चा चालू आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित या चित्रपटात काय असणार आहे याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. प्रसादने केवळ या चित्रपटाचे पोस्टर शेअर करून सगळ्यांची उत्सुकता ताणली होती. परंतु काही दिवसांनी त्याने चित्रपटात प्रमुख भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्रीचा चेहरा दाखवला.यावेळी अमृता खानविलकरला ‘चंद्रमुखी’ भूमिकेत पाहून सगळ्यांना आनंद झाला. या चित्रपटातील अनेक गाणी देखील समोर आली आहेत. यातील अमृताचा डान्स पाहून तर सगळे थक्क झाले आहे.
अशातच अनेक चित्रपट स्पर्धेत असताना चंद्रमुखीचे जोरदार प्रमोशन चालू आहे. कलाकार अनेक ठिकाणी भेट देऊन प्रमोशन देत आहेत. खास म्हणजे अगदी सार्वजनिक ठिकाणी जाऊन देखील या चित्रपटासह प्रमोशन चालू आहे. अशातच अमृता खानविलकर आणि चित्रपटाची टीम प्रमोशन करण्यासाठी पुण्यात आली आहे. खास म्हणजे नव्याने सुरु झालेल्या पुणे मेट्रोने या कलाकारानी प्रवास केला आहे प्रमोशन केले.
अमृताने मेट्रिओमधील मुलींसोबत तिच्या लोकप्रिय ‘चंद्रा’ या गाण्यावर डान्स केला. पॅसेंजर देखील तिच्या सोबत ठुमके मारण्यात कुठेही कमी पडले नाही. यावेळी तिने पांढया रंगाची साडी आणि ब्लाउज घेतला होता. या सध्या रूपात देखल ती अगदी खुलून दिसत होती. ती मेट्रोमध्ये अगदी धमाल करताना दिसत आहे.
प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी हा चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आपल्याला अमृता खानविलकरच्या अनेक नजाकती पाहायला मिळणार आहे. सगळेजण हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-