‘तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हे बनाया,’ म्हणत चाहत्याने केले अमृता खानविलकरच्या ग्लॅमरस लूकचे कौतुक


मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर ही अभिनयासोबत तिच्या डान्समुळे देखील सर्वत्र चर्चेत आहे. तिच्या मनमोहक नृत्याविष्काराने ती नेहमीच सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते. ‘नटरंग’ या चित्रपटातील तिच्या ‘वाजले की बारा’ या लावणीने तर आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले होते. सोशल मीडियावर देखील अनेकवेळा ती तिचे डान्स व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिचे काही ग्लॅमरस फोटो समोर आले आहेत.

अमृताने हे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने पांढऱ्या रंगाचा एक ग्लॅमरस ड्रेस घातला आहे. तिचा हा ड्रेस तिच्यावर खूप आकर्षक दिसत आहे. तिने हेअर स्ट्रेट करून सुंदर असे ईअरिंग घातले आहेत. तसेच पायात हाय हिल्स घातले आहेत. तिच्या चाहत्यांना हा लूक खूप आवडला आहे. (amruta khanvilkar share her photos on social media)

हे फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “2022 मध्ये प्रवेश करताना.” तिचे अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हे बनाया.” तसेच आणखी एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “मराठीची उर्वशी रौतेला.” यासोबत श्रेया बुगडे, पूजा सावंत आणि ईशा भानुशाली या अभिनेत्रीने देखील या फोटोवर कमेंट केल्या आहेत.याआधी देखील अमृताने तिचे काळ्या रंगाच्या ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो शेअर केले होते. तेव्हा देखील फोटोवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला होता.

अमृताने २००४ साली ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज’ या रियॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर २००५ साली तिने ‘अदा’ आणि ‘टाईम बॉम्ब ९/१२’ या मालिकांमध्ये काम केले. तिच्या या पात्रांचे सर्वत्र कौतुक झाले. यानंतर २००६ साली तिला चित्रपटातून ऑफर आली. तिने ‘गोलमाल’ या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याच वर्षी तिने ‘मुंबई सालसा’ या हिंदी चित्रपटात काम केले. यानंतर तिने अनेक मराठी चित्रपटात काम करून नाव कमावले.

हेही वाचा :

शाहरुख खानच्या ‘या’ अभिनेत्रीने शेअर केले अंघोळ करतानाचे फोटो, कडाक्याच्या थंडीत वाढवले तापमान

‘बचपन का प्यार’ फेम सहदेव दिरदोच्या चेहऱ्यावर परतले हसू, उपचारासाठी जाणार ‘या’ ठिकाणी

अनुपम खेर यांच्या पुतणीचं लग्न, आई दुलारीनं उघड केलं सिकंदरच्या बालपणीचं ‘हे’ रहस्य 

 


Latest Post

error: Content is protected !!