‘नटरंग’ चित्रपटातील ‘वाजले की बारा’वर थिरकत, अभिनेत्री अमृता खानविलकरने प्रेक्षकांची मने चोरली. आपल्या अप्रतिम नृत्य कौशल्याचा वापर करून तिने इंडस्ट्रीमध्ये आपली जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. याशिवाय अमृता आपल्या फिटनेसबाबत बऱ्याच चर्चा रंगवत असते. ती तिच्या फिटनेसबाबत बरीच गंभीर आहे. दरदिवशी वेगवेगळ्या योगा पोझेसचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत, अभिनेत्री अवघ्या सोशल मीडियाचे लक्ष वेधते. नुकताच तिने तिचा एक फोटो शेअर केला आहे, जो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
अमृता खानविलकरने शेअर केलेला हा फोटो सेल्फी क्लिक आहे. यात तिने केस मोकळे सोडले आहेत, तर कॅमेऱ्याकडे बघून हसत आहे. विशेष म्हणजे, हा फोटो तिने सूर्यनमस्कार केल्यानंतर क्लिक केला आहे. अभिनेत्री दररोज न चुकता व्यायाम आणि सूर्यनमस्कार करते. याचा परिणाम आपल्याला तिच्या चेहऱ्यावर सहज पाहायला मिळेल. तिचा चेहरा चमकदार झाला आहे. याचाच उल्लेख अभिनेत्रीने कॅप्शनमध्येही केला आहे. (amruta khanvilkar shared her morning selfie after doing surya namskar)
हा फोटो शेअर करत अमृता म्हणतेय की, “जर नियमित सूर्यनमस्कार केले, तर फिल्टरची गरजच काय!” अमृताने तिचा हा फोटो तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंत केला जात आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांव्यतिरिक्त अनेक कलाकारांनी देखील कमेंट केली आहे. आतापर्यंत या फोटोवर २९ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.
अमृता खानविलकरने ‘गोलमाल’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर ती बऱ्याच चित्रपटात पाहायला मिळाली. इतकेच नव्हे, तर तिने हिंदी चित्रपटातही बऱ्याच महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीचा ‘वेल डन बेबी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीझ झाला आहे. यात तिच्यासोबत पुष्कर जोग आणि वंदना गुप्ते हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. याशिवाय लवकरच ती ‘पॉंडीचेरी’ या मराठी चित्रपटातही दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-विजय देवरकोंडाने वाढदिवसानिमित्त आईला दिली ‘ही’ अनोखी भेट; पाहुन तुम्हीही व्हाल स्तब्ध
-ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार फेस्टिवल धमाका! ऑक्टोबरमध्ये भेटीला येतायेत ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज