‘नटरंग’ चित्रपटातील ‘वाजले की बारा’ या गाण्यात उत्कृष्ट डान्स करत, अमृता खानविलकरने रसिकांना वेड लावले. आजही हे गाणे ऐकले तर चाहते नक्कीच अमृताची आठवण काढत असतील. फक्त नृत्यानेच नव्हे, तर आपल्या सुंदरतेमुळेही ती चाहत्यांच्या मनावर राज्य करते. सतत वेगवेगळ्या लुकमधील फोटो शेअर करत, ती चर्चेत येण्याची एकही संधी सोडत नाही. पाश्चिमात्य असो वा पारंपारिक असो, ती प्रत्येक लुकमध्ये स्वतःला सामावून घेते.
अशामध्ये, अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. यात अमृता काळ्या रंगाच्या साडीमध्ये अगदी उठून दिसत आहे. यात तुम्ही पाहू शकता की, तिने साडीवर स्ट्रॅपलेस ब्लाउज घातला आहे, ज्यात ती खूपच हॉट दिसत आहे. फोटोमधील तिचे केस अन् साडी सर्वच अगदी पाहण्यासारखे आहे. एकंदरीत साडी लूकला अभिनेत्री ज्याप्रकारे मॉर्डन टच दिला आहे, तो पाहून नेटकरी भांबावून गेले आहेत. शिवाय यातील अभिनेत्रीच्या अदा पाहून चाहत्यांसोबतच सेलिब्रिटीही तिच्यावर फिदा झाले आहेत.
अमृताचं कॅप्शन पाहून, तिने हा लूक झी मराठी अवॉर्डसाठी केला असल्याचा दिसत आहे. चाहते तिच्या या फोटोंना खूप प्रेम देत आहेत. कमेंट्स बॉक्समध्ये तिच्या कौतुकाचे पूल बांधण्यात चाहते कोणतीही कसर सोडत नाहीयेत. शिवाय यावर कलाकारांच्याही प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीने कमेंट करत लिहिलंय की, “अरे कोई तो रोक लो!”, शिवाय यावर श्रेया बुगडे, सायली संजीव, सुखदा खांडकेकर, मंजिरी ओक, ऋतुजा बागवे या अभिनेत्रीनी कमेंट्स केल्या आहेत.
अमृता खानविलकरने ‘गोलमाल’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर ती बऱ्याच चित्रपटात पाहायला मिळाली. इतकेच नव्हे, तर तिने हिंदी चित्रपटातही बऱ्याच महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, लवकरच ती ‘पॉंडीचेरी’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘तुझी माझी जोडी जमली’, गाण्यावर मानसीने पतीसोबत धरला ठेका; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’
-पिवळ्या रंगाच्या साडीत मितालीने दिल्या झक्कास पोझ; चाहताही म्हणाला, ‘खूप खूप जास्त सुंदर दिसताय’
-‘…खरचं साडीपेक्षा तू जास्त सुंदर दिसतेस’, श्रुती मराठेच्या फोटोवरील चाहत्यांची कमेंट ठरतेय लक्षवेधी