Friday, November 22, 2024
Home अन्य ‘तुमची आठवण…’ लक्ष्मीकांत बेर्डेंच्या वाढदिवसानिमित्ताने लेकीची भावुक पोस्ट; चाहते म्हणाले, ‘लक्ष्या मामा…’

‘तुमची आठवण…’ लक्ष्मीकांत बेर्डेंच्या वाढदिवसानिमित्ताने लेकीची भावुक पोस्ट; चाहते म्हणाले, ‘लक्ष्या मामा…’

महाराष्ट्रातील सर्वांचे लाडके, मराठी सिनेसृष्टीतील ‘हास्यसम्राट’ लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्मृतीनिमित्त आज त्यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. 26 ऑक्टोबर 1953रोजी जन्मलेल्या लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदी शैलीने रसिकांच्या मनात अटळ स्थान निर्माण केलं आहे.

1984 साली ‘लेक चालली सासरला’ चित्रपटाद्वारे लक्ष्मीकांत बेर्डेंनी ( Laxmikant Baird)  मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ‘धुमधडाका’, ‘गडबड गोंधळ’, ‘आम्ही दोघे राजा राणी’, ‘दे दणादण’, ‘प्रेम करूया खुल्लम खुल्ला’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘मज्जाच मज्जा’, ‘एक गाडी बाकी अनाडी’, ‘फेकाफेकी’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘भुताचा भाऊ’, ‘थरथराट’, ‘हमाल दे धमाल’, ‘धडाकेबाज’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी विनोदीसह गंभीर भूमिका केल्या. या भूमिका प्रेक्षकांच्या मनात ठसठशीतपणे कोरल्या गेल्या आहेत.

2004 साली लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन झाले. मात्र, त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीवर एक मोठं दुःख ओढावलं. आज त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार, चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. त्यांची लाडकी लेक स्वानंदी बेर्डेने भावुक फोटो शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swanandi L Berde (@swanandiberde)

स्वानंदी बेर्डेने पोस्ट करताना लिहिले की, “69वा वाढदिवस…तुमची आठवण येते…” तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी अनेक लाईक आणि कमेंट केल्या आहेत. यावर कमेंट करताना एकाने लिहिले की, “..ज्यांचे पिक्चर बघत आम्ही लहानाचे मोठे झालो…त्यांना विसरणे कधीच शक्य नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!” दुसऱ्याने लिहिले की,”विनोदवीर अक्टिंग ज्याने सर्वांच्या मनावर राज्य केलेल्या तो आमचा लक्ष्या. लक्ष्मीकांत बेर्डे साहेबांना मनाचा मुजरा.” तर अनेकांनी लक्ष्या मामा मिस यू म्हटले आहे.

मराठी सिनेसृष्टीतील ‘हास्यसम्राट’ लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डेने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. स्वानंदीने ‘रिस्पेक्ट’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. स्वानंदीने रंगमंचावरही काम केलं आहे. ‘धनंजय माने इथेच राहतात’ या नाटकातून तिने रंगमंचावर पदार्पण केलं. या नाटकात तिची आई प्रिया बेर्डे मुख्य भूमिकेत आहेत. स्वानंदीने या नाटकात एक महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तिच्या अभिनयाचं कौतुक झालं आहे. (An emotional post by Lake Swanandi Berde on the occasion of Laxmikant Berde’s birthday)

आधिक वाचा-
सलग 3 फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर रणवीर गेला होता खचून, म्हणाला, ‘मी खूप सहन केले’
दोन ‘सिंगल’ मिळून करणार सुपर धमाल; अभिनयच्या प्रेमाच्या आड प्रथमेश येत असेल? एकदा नक्की वाचा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा