Thursday, November 30, 2023

निवेदिता सराफ यांना आली लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आवडत्या डिशची आठवण, सांगितली खास गोष्ट

मराठी चित्रपसृष्टीतील नावाजलेला अभिनेता आज काळाच्या पडद्याआड गेला असला तरी, प्रेक्षकांच्या मनावर तो आजही राज्य करत आहे. हा अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) म्हणजेच आपला सर्वांचा लाडका लक्ष्या. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे नाव घेताच त्यांचे अनेक चित्रपट डोळ्यासमोर येतात. चित्रपटातील त्यांचा विनोदी स्वभाव आजही प्रेक्षकांना भावतो. ते एक असे अभिनेते होते ज्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. मराठी चित्रपटसृष्टीत हा चमचमणाऱ्या ताऱ्याला प्रेक्षकांनी तर अगदी डोक्यावरचं घेतलं होतं. त्याचबरोबर निवेदिता जोशी-सराफ (Nivedita Saraf) आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये एकत्र काम केले होते. ज्यामुळे ते सतत चर्चेत राहिले.

खरंतर निवेदिता सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे एकमेकांसाठी कोणी लांबचे नव्हते, तर एकमेकांचे बालपणीचे मित्र होते. त्यांनी बालपणापासूनच एकत्र काम करण्यास सुरुवात केली होती. पुढे जात या दोन कलाकारांनी पुढे मराठी चित्रपट सृष्टीत धुमाकूळ घातला. आपल्या दमदार अभिनयाने या दोन्ही कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. हे दोन्ही कलाकार अगदी बालपणापासून एकत्र असल्यामुळे त्यांच्यातील बॉण्डिंग हे खूप सुंदर होते.

इतकच नाही तर निवेदिता सराफ त्यांचे लग्न झाल्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या घराशेजारी तब्बल दहा वर्षे राहत होत्या. त्यामुळे त्यांची मैत्री अधिकच घट्ट होत गेली. आजही निवेदिता सराफ यांच्यासाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांची मैत्री मला जिवंत आहे. आजही लक्ष्मीकांत आणि त्यांची मैत्री विसरलेल्या नाहीत. याचा खुलासा त्या त्यांच्या बोलण्यातून करत असतात. लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्यांच्याविषयी अनेक आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

असाच एक लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतचा अविस्मरणीय किस्सा निवेदिता सराफ यांनी चाहत्यांसोबत शेअर केला आहे. निवेदिता सराफ यांचे युट्यूबवर रेसिपी आहे. या चॅनेलवर त्या विविध खाद्यपदार्थ करून प्रेक्षकांना दाखवत असतात. त्याचवेळी त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण काढली.

त्याचवेळी निवेदिता सराफ म्हणाल्या की, “लक्ष्यासोबत मी अनेक नाटकात, सिनेमात काम केलं आहे. त्याला एक डिश अतिशय आवडती होती. सकाळच्या नाश्त्याला, दुपारच्या जेवणात, संध्याकाळी चहाच्यावेळी आणि रात्रीच्या जेवणावेळी अशी कधीही ही डिश खायची त्याची तयारी असायची, ती म्हणजे खोबऱ्यातली सुरमई.”

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर ‘आई तुझे उपकार’, ‘सत्वपरीक्षा’, ‘रंग प्रेमाचा’, ‘धूमधडाका’, ‘तुझ्यावाचून करमेना’, ‘गडबड घोटाळा’, ‘धाकटी सून’, ‘कळतंय पण वळत नाही’, ‘खरे कधी बोलू नये’, ‘प्रेम करूया खुल्लम खुल्ला’, ‘दे दणादण’, ‘थरथराट’, ‘येडा की खुळा’, ‘शुभमंगल सावधान’, ‘झपाटलेला’, ‘माझा छकुला’, ‘कमाल माझ्या बायकोची’, ‘पछाडलेला’ यांसारख्या चित्रपटात काम केले. यातील एक चित्रपट मात्र खूपच लक्षवेधी ठरला होता. तो म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’. या चित्रपटात त्यांनी स्त्रीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांची भूमिका खूप गाजली होती.

हेही वाचा :
लक्ष्मीकांत बेर्डे यांना दिवसरात्र हा पदार्थ दिला तरी आवडायचा, निवेदिता सराफ यांनी सांगितली खास आठवण
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ‘या’ चित्रपटात केले होते 1 रुपयात काम, वाचा संपूर्ण कहाणी

हे देखील वाचा