सध्या सगळीकडे बिग बॉस मराठीची हवा आहे. या कार्यक्रमाची सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे. अनेक धमाकेदार गोष्टी या घरात कायम घडत असतात. या शोमध्ये यावर्षी एकूण १६ स्पर्धक सहभागी झाले होते. एक आता बाकीचे १५ सदस्य घरात धुडगूस घालत आहेत. घरात सध्या अनेक वादविवाद बघायला मिळत आहेत. घरात दोन वेगवेगळे गट देखील बघायला मिळत आहेत. भाऊचा धक्का या सेगमेंट अंतर्गत रितेश देशमुख सगळ्यांची क्लास घेत असतो.
घरात काही दिवसांपूर्वी मालवणी भाषेच्या बाबतीत वाद झाला होता तसेच दोन चिमुकल्या बाळांच्या आगमनानंतर निक्की तांबोळी हिने विरुद्ध गटातील बाळाचा एक पायाच तोडला होता. ‘बिग बॉस’ने देखील हा भावनांचा खेळ होता पण, तुम्ही सगळे भावनाशून्य होऊन खेळलात अशी टिप्पणी यावर केली होती. असेच सगळे वादविवाद होत असल्याने आता मराठी कलाविश्वातून अनेक कलाकारांच्या भिन्न भिन्न प्रतिक्रिया येत आहेत.
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत काम केलेली अभिनेत्री अनघा अतुलने यासंदर्भात पोस्ट शेअर करत ती एक तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अनघाने लिहिले, “बिग बॉस मराठी…एक विनंती आहे. एक दिवस वाइल्ड कार्ड एन्ट्री द्या! बाई आणि बुगू बुगू च्या श्रीमुखात लगावयाची आहे.”
निक्की घरात सारखी “बाईईई…” असं म्हणत असते. त्यामुळे अनघा निक्कीच्या बाबतीत हे म्हणत आहे असं स्पष्ट होत आहे. दरम्यान, अनघाच्या आधी अभिजीत केळकर, मेघा धाडे, सुरेखा कुडची, जय दुधाणे यांनी देखील निक्कीच्या वागणुकीबद्दल संताप व्यक्त केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –