Thursday, March 5, 2026
Home बॉलीवूड साेनम दिसली लेक वायुला किस करताना, वडिल आनंदने शेअर केला गाेंडस व्हिडिओ

साेनम दिसली लेक वायुला किस करताना, वडिल आनंदने शेअर केला गाेंडस व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर चित्रपटसृष्टीत अभिनयापेक्षा तिच्या फॅशन सेन्ससाठी चर्चेत असते. सोनमला बॉलिवूडची फॅशनिस्टा देखील म्हटले जाते. अशात काल म्हणजेच साेमवारी (दि. 8 मे)ला सोनम कपूरने पती आनंद आहुजासोबत लग्नाचा वाढदिवस साजरा केला. यावेळी आनंदने सोनमसोबतचे अनेक रोमँटिक फोटो शेअर केले आणि तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यासाेबत आनंदने मायलेकाचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये सोनम तिचा मुलगा वायुसोबत खेळताना दिसत आहे, ज्याला चाहत्यांची देखील चांगलीच पसंती मिळत आहे. नेमके काय आहे व्हिडिओमध्ये? चला, बघूया…

आनंद आहुजा (anand ahuja) याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत, ज्यावर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. शेअर केलेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये, सोनम तिचा मुलगा वायुवर प्रेमाचा वर्षाव करत वायूला किस करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by anand s ahuja (@anandahuja)

अशात या व्हिडिओमध्ये वायूचा चेहरा दिसत नसला, तरी आई आणि मुलामधील प्रेम स्पष्टपणे दिसत आहे. यादरम्यान सोनमने ऑफ व्हाइट कलरचा चिकन सलवार सूट घातला आहे. तर, वायुने निळ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. याशिवाय सोनम आणि आनंदचे अनेक फोटो या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by anand s ahuja (@anandahuja)

सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या लग्नाला 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सोनम आणि आनंदने 8 मे 2018 रोजी लग्न केले. दोघांच्या लग्नाची खूप चर्चा देखील झाली होती. या जाेडप्याच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले हाेते. अशात लग्नाच्या दाेन वर्षानंतर सोनमने 20 ऑगस्ट 2022 रोजी मुलगा वायुला जन्म दिला.(anand ahuja shares wife sonam kapoor and sons vayu kapoor cute and adorable video on social media )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
स्मृती इराणींनी विवाहितांना दिला मजेशीर सल्ला, शेअर केला दयाबेनचा ‘ताे’ व्हिडिओ, चाहते हसून हसून लाेटपाेट

“ही ओळख आयुष्यभर जपेन” प्रिया बापटने वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सांगितले लग्नानंतर नाव न बदलण्याचे कारण

हे देखील वाचा