Wednesday, February 21, 2024

“12वी फेल राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी” आनंद महिंद्रा; काय आहे विक्रांत मेस्सीची प्रतिक्रिया !

विक्रांत मेस्सी स्टारर ’12वी फेल’ चित्रपट रिलीजपासुन अडीच महिन्यानंतरदेखील चर्चेत आहे. विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटाचे प्रेक्षकांसोबतच समीक्षकांकडूनही प्रचंड कौतुक केलं जातंय. चित्रपटाच्या पटकथेसोबतंच कलाकारांच्या अभिनयाचीही प्रशंसा केली जात आहे. त्याचसोबत काही दिग्गज हस्तींकनीही या चित्रपटाचे भरभरुन कौतुक केले आहे. आता या लिस्टमध्ये महिंद्रा एँड महिंद्रा कंपनीचे चेअरपर्सन आनंद महिंद्रा यांचाही समावेश झाला आहे. आनंद महिंद्रांनी या चित्रपटाची खुप प्रशंसा केली आहे,त्याचसोबत ’12वी फेल’ चित्रपटातील मुख्य भुमिका साकारणाऱ्या विक्रांत मेस्सीला राष्ट्रीय पुरस्कार देण्याचंही ते बोलले.

आनंद महिंद्रा यांनी ’12वी फेल’च्या(12th fail) संपूर्ण टीमचे कौतुक करत, लोकांना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले. त्यांच्या X (आधीचे ट्विटर) हँडलवर आनंद महिंद्रा यांनी लिहिले, “शेवटी गेल्या आठवड्यात ’12वी फेल’ चित्रपट पाहिला. तुम्हाला या वर्षी फक्त एकच चित्रपट बघायचा असेल तर तो चित्रपट हा असुद्या.
दरम्यान, त्यांनी(Anand Mahindra) या चित्रपटाच्या पटकथेपासुन विधु विनोद चोप्रांच्या दिग्दर्शनाचीही प्रशंसा केली. पोस्टमध्ये त्यांनी पुढे लिहीले,” ही कथा देशातील रियल लाइफ हिरोवर आधारित आहे. फक्त हिरोच नाही, तर लाखो तरुण, यशासाठी भुकेले आहेत,ते जगातील सर्वात टफ परीक्षांमधील एक मानली जाणाऱ्या UPSC परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रचंड अडचणींविरुद्ध संघर्ष करतात.

पुढे त्यांनी लिहिले “या चित्रपटातुन विधु चोप्रांनी( vidhu vinod chopra) जबरदस्त सिनेमा हा उत्तम कथेतुन बनतो याची आठवण करून दिली आहे. या चित्रपटातील स्पेशल इफेक्ट्सला आणि अत्यंत योग्य पद्धतीने मांडलेल्या कथेच्या साधेपणा आणि सत्यतेला तोड नाही.” आनंद महिंद्रानी त्यांना आवडलेल्या भागाबद्दल लिहिले, “माझ्यासाठी मुख्य आकर्षण म्हणजे मुलाखतीचे दृश्य. हो, हे थोडंसं काल्पनिक वाटू शकतं, परंतु सखोल संवादामुळे हा सिक्वेंस तुमच्या डोळ्यांसमोर येतो आणि भारताने नवीन भारत निर्माण करण्यासाठी काय केले पाहिजे हे दाखवतो.”
या चित्रपटाच्या हिरोबद्दल त्यांनी लिहिले “तो केवळ पात्र साकारत नव्हता तर तो ती भुमिका जगत होता. त्याने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी योग्य असा परफॉर्मन्स दिला आहे.”

आनंद महिंद्रांच्या या प्रशंसेवर अभिनेता विक्रांत मेस्सीने(vikrant massey) आभार मानले आहेत. त्याने लिहीले, ” धन्यवाद मिस्टर महिंद्रा, सिनेमासाठी आणि आमच्या प्रयत्नांसाठी तुमच्याकडुन मिळालेली प्रतिक्रिया माझ्यासाठी आणि संपुर्ण टीमसाठी खुप महत्वाची आहे. आम्हाला काहीतरी योग्य केल्याचा आनंद आहे.” 12वी फेल चित्रपट सध्याला डीज्नी हाॅटस्टारवर स्ट्रीम होत आहे. रिलीजपासुन या चित्रपटातील कलाकारांच्या लोकप्रियतेतही वाढ झाली आहे. सोशल मिडीयावर देखील त्यांच्या फाॅलोवरसमध्येही वाढ झाली आहे.

हे देखील वाचा