भारतासह जगभरात सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी(Anant Ambani ) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून यांच्या लग्नसंदर्भात अनेक अपडेट्स समोर येत आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant Ambani and Radhika Merchant) यांच्या लग्नापूर्वी १ ते ३ मार्च दरम्यान प्री-वेंडिग समारंभ आयोजित केला आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या शाही प्री-वेडिंग फेस्टिव्हलला बॉलिवूड सेलेब्ससह जगभरातील अब्दाधिश हजेरी लावणार आहेत. तर जाणून घेवुया पाहुण्यांच्या यादीतील नावं.
अनंत अंबानी (Anant Ambani )यांचे गुजरातमधील जामनगर येथे लग्नाशी संबंधित समारंभ पार पडणार आहेत. १ ते ३ मार्च या कालावधीत विवाह सोहळा पार पडणार आहे. तत्पुर्वी पाहुण्यांची यादी समोर आली आहे. जागतिक पातळीवरील प्रभावशाली नेते, अब्जाधीश, बॉलीवूडमधील स्टार आणि अनेक खेळाडू या प्री-वेडिंग फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेणार आहेत.
आंतरराष्ट्रीय सुपरस्टार रिहाना आपल्या हिट गाणांचे प्रदर्शन यावेळी करणार आहे. तसेच सोलफुल सिंगर अरिजीत सिंह, प्रतिभाशाली दिलजीत दोसांझ, संगीतकार जोडी अजय-अतुल आणि दिग्गज जादूगर डेव्हिड ब्लेन हे यामध्ये असणार आहेत.
अब्जाधिश लावणार हजेरी
अनंत अंबानीच्या(Anant Ambani ) प्री-वेडिंगला जागतिक दिग्गज येणार आहेत. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग, माइक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्प येणार आहेत.
अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई, वॉल्ट डिजनीचे सीईओ बॉब इगर, ब्लॅकरॉकचे अध्यक्ष लॅरी फिंक, ब्लॅकस्टोनचे संस्थापक स्टीफन श्वार्जमॅन, मॅक्सिकन व्यवसायी मॅग्नेट कार्लोस स्लिम, सऊदी अमिरातमधील रामकोचे अध्यक्ष यासिर अल रुमैयान, मॉर्गन स्टेनलीचे सीईओ टेड पिक, बर्कशायर हॅथवेचे उपाध्यक्ष अजीत जैन, एडोबचे सीईओ शांतनू नारायण, भूतानचे राजा आणि त्यांची पत्नी, कतारचे पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुलरहमान बिन जसिम अल थानी आणि WEF चे अध्यक्ष क्लॉस श्वाब येणार आहेत.
भारतातील उद्योगपती असणार
टाटा समूहाचे एन चंद्रशेखरन, कुमार मंगलम बिर्ला आणि त्यांचा परिवार येणार आहे. गौतम अदानी आणि त्यांचा परिवार, गोदरेज परिवार, नंदन नीलेकणी, संजीव गोयंका, ऋषद प्रेमजी, उदय कोटक, अदार पूनावाला, सुनील मित्तल, पवन मुंजाल, रोशनी नादर, निखिल कामथ, रोनी स्क्रूवाला आणि दिलीप संघवी पोहचणार आहे.
क्रिकेट खेळाडूंसह बॉलिवूड सेलेब्स
सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, रोहित शर्मा, केएल राहुल, हार्दिक पंड्या, ईशान किशन यासारखे दिग्गज खेळाडू कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
तर, बॉलीवूडमधून अमिताभ बच्चन, रजनीकांत, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, शाहरुख, आमिर खान, सलमान खान सैफ अली खान असणार आहे. तसेच माधुरी दीक्षित कार्यक्रमास येणार आहे. अभिषेक-ऐश्वर्या, अजय देवगण-काजोल, रणवीर-दीपिका, रणबीर-आलिया आणि विक्की-कॅटरीना कार्यक्रमास येणार आहेत.
हेही वाचा:
Prathamesh Parab: ‘तुझी आठवण मात्र कायम…’लग्नापूर्वी दगडुच्या होणाऱ्या बायकोची भावुक पोस्ट