Friday, September 20, 2024
Home मराठी Prathamesh Parab: ‘तुझी आठवण मात्र कायम…’लग्नापूर्वी दगडुच्या होणाऱ्या बायकोची भावुक पोस्ट

Prathamesh Parab: ‘तुझी आठवण मात्र कायम…’लग्नापूर्वी दगडुच्या होणाऱ्या बायकोची भावुक पोस्ट

“मला वेड लागले प्रेमाचे…” म्हणत घराघरात पोहोचलेला दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब (prathamesh parab )लवकरच गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरसोबत (kshitija ghosalkar ) लग्नबंधनात अडकणार आहे. दोघांच्या घरी लग्नाआधीच्या विधी सुरु आहेत. अशातच क्षितीजा घोसाळकरने केलेली भावुक पोस्ट चर्चेत आली आहे.

प्रत्येक मुलीला सासरी जाताना आपलं आई वडीलांच घर सोडून जाणं फार कठीण जातं. जिथे आपण खेळलो बागडलो, अनेक चढ उतार पाहिले, ज्या घरात आपण मनसोक्त जगत आलेलो असतो. तिथल्या आजूबाजूच्या माणसांमध्ये मन गुंतलेलं असत असं घर सोडून एखाद्या अनोळखी ठिकाणी जाऊन आपलं नविन आयुष्याला सुरुवात करणं हे सासरी जाणाऱ्या मुलीला फार जड जातं. असंच काहीस दगडुच्या होणाऱ्या बायकोचं म्हणजेच क्षितीजाचं झालं आहे. लग्नापूर्वी तिंन आपल्या घरासंदर्भात भावुक पोस्ट लिहिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kshitija Ghosalkar (@miles_in_style)

“Dear Home Sweet Home, आज सजलेल्या मंडपाने किती छान दिसतंय माझं घर. आजपर्यंत , तुझी ‘माझं घर’ अशी असलेली ओळख आता ‘माझं माहेर’ अशी होणार..आणि आता अवघ्या काही तासांतच मी तुझा निरोप घेणार…तुझ्या प्रत्येक कोपऱ्याशी असलेल्या आठवणींना आज जणू खास एक चेहराच मिळालाय! बघ ना, काही मनसोक्त हसतायत…काही अलवार रडतायत..काहींमध्ये मला माझं बालपण दिसतंय…तर काहींमध्ये मी सासरी जाणार म्हणून होणारी घालमेल…त्या सगळ्यांना मी माझ्या हृदयाच्या कुपीत कायम जपून ठेवणार…”

“सणावाराला येईन आवर्जून, तुझी भेट घ्यायला…तुही मग तयार राहा, आपलं नेहमीचं हितगुज करायला…PS- सासरी रमेपर्यंत आणि रमल्यानंतरही तुझी आठवण मात्र कायम येईल,” अशा आशयाची भावूक पोस्ट क्षितीजाने लिहिली आहे.
तिची ही पोस्ट पाहून पाहिल्यानंतर अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत. तर काहींनी कमेंट्स करत दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रथमेश-क्षितिजाचा प्रेमविवाह आहे. इन्टाग्रामवर दोघांची पहिली ओळख झाली. त्यानंतर इन्स्टाग्रामवर गप्पा मारत-मारत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. ‘टाइमपास ३’च्या चित्रीकरणादरम्यान पहिल्यांदाच प्रथमेश व क्षितिजा भेटले. यानंतर दोघांची मैत्री आणखी दृढ झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

हेही वाचा:

Crew | ‘क्रू’ चित्रपटाच्या स्टार कास्टच्या प्रेमात पडला ऋतिक रोशन, अभिनेत्रींचे कौतुक करत म्हणाला…

Divya Agarwal Pregnancy : लग्नापूर्वीच प्रेग्नेंट…दिव्या अग्रवाल भडकली, अफवांवर सोडलं मौन

author avatar
tdadmin

हे देखील वाचा