अं’मली पदार्थ प्रकरणामुळे अनन्याच्या हातातून निसटला मोठा चित्रपट? बिघडणाऱ्या इमेजमुळे होणार नुकसान?

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अं’मली पदार्थ प्रकरणात अडकल्यानंतर, आता या प्रकरणाशी संबंधित अनेक खुलासे होत आहेत. चंकी पांडेची मुलगी आणि ‘पती पत्नी और वो’ फेम अभिनेत्री अनन्या पांडे या दिवसात चर्चेत आली आहे. आजकाल ती अं’मली पदार्थ प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या चौकशीमुळे चर्चेत आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) आतापर्यंत अनन्या पांडेची एकूण २ वेळा चौकशी केली आहे आणि आता तिला सोमवारीही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या प्रकरणात अडकल्यानंतर अनन्या पांडेची ब्रँड व्हॅल्यू घसरल्याचीही माहिती समोर येत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ananya ???????? (@ananyapanday)

अनन्याच्या हातातून निसटला मोठा चित्रपट?
अं’मली पदार्थ प्रकरणात अडकल्यानंतर अनन्याच्या हातातून एक मोठा चित्रपट निसटला असल्याची माहिती समोर येत आहे. या चित्रपटात ती साऊथचा सुपरस्टार थलापती विजयसोबत दिसणार होती. अशा बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत की, अनन्या पांडेला साऊथ सुपरस्टार थलपती विजयचा पुढचा चित्रपट ‘थलापती ६६’ मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Ananya ???????? (@ananyapanday)

प्रकरणामागील सत्य काय आहे?
तर अनन्याने बिघडलेल्या इमेजमुळे खरोखरच तिचा पहिला कॉलिवुड चित्रपट गमावला आहे का? माध्यमांतील वृत्तानुसार, अनन्या पांडेला या प्रोजेक्टची ऑफरही देण्यात आलेली नाही. मग तिला या चित्रपटातून कसे काढले जाऊ शकते? ही फक्त एक खोटी आणि निराधार गोष्ट आहे. अनन्या पांडेकडे अनेक मनोरंजक प्रोजेक्ट आहेत आणि ती त्यामध्ये व्यस्त आहे.

View this post on Instagram

A post shared by Ananya ???????? (@ananyapanday)

अनन्या पांडे वर्कफ्रंटवर काय करत आहे?
अनन्या पांडे सध्या तिच्या बहुप्रतिक्षित ‘लायगर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती टॉलिवूड सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जगन्नाथ पुरी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाची सहनिर्मिती चार्मी कौर आणि करण जोहर करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘एनसीबीला माझे नाव सांगू नको, म्हणायला गेलाय’, अनन्याच्या घरी बुके घेऊन गेलेल्या ईशानची नेटकऱ्यांनी उडवली टिंगल

-‘अरे बिचाऱ्या मुलांवर जरा दया दाखवा’, राखी सावंतचा आर्यन अन् अनन्याला पाठिंबा

-अनन्या पांडेच्या अडचणीत वाढ; जुने चॅट रिट्रिव्ह करण्यासाठी एनसीबीने जप्त केल्या ‘या’ गोष्टी

Latest Post