‘एनसीबीला माझे नाव सांगू नको, म्हणायला गेलाय’, अनन्याच्या घरी बुके घेऊन गेलेल्या ईशानची नेटकऱ्यांनी उडवली टिंगल

चंकी पांडेची मुलगी आणि ‘पती पत्नी और वो’ फेम अभिनेत्री अनन्या पांडे आता चर्चेत आली आहे. आजकाल ती अं’मली पदार्थ प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या चौकशीमुळे चर्चेत आहे. गेल्या तीन दिवसांपासून सतत चौकशी केल्यानंतर, एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिचा मित्र बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टर स्वतः अनन्याच्या घरी फुलांचा गुच्छ घेऊन जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून ट्रोलर्स ईशानला ट्रोल करत आहेत.

अनन्या गेल्या काही दिवसांपासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या रडारवर असून, तिची सतत चौकशी सुरू आहे. तीन दिवस सतत चौकशी केल्यानंतर अनन्याचा खास मित्र ईशान खट्टर तिच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तिच्या घरी पोहोचला. एका सोशल मीडियावर अकाऊंटवरून हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये इशान खट्टर फुलांच्या दुकानात फुलांचा बुके बनवून घेताना दिसत आहे. हा बुके खरेदी केल्यानंतर ईशान त्याच्या कारमध्ये बसला आणि त्यानंतर ईशानची कार अनन्याच्या घराकडे जाताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोकांनी याला खरे प्रेम म्हटले आहे. त्याचबरोबर काही जण असे आहेत, जे व्हिडिओ पाहिल्यानंतर ईशानची टिंगल उडवताना दिसत आहेत. एका युजरने लिहिले की, “बोलण्यासाठी गेलो होतो, प्लीज माझे नाव घेऊ नको.” एका यूजरने लिहिले की, “फुले देऊन तू हेच सांगितले असेल, प्लीज माझे नाव एनसीबीला सांगू नको.” एका यूजरने लिहिले की, “याचे तर करिअरही नाही, जे एनसीबी संपवेल.”

ईशान खट्टर आणि अनन्या पांडे ‘खाली पीली’ चित्रपटात एकत्र दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही, मात्र चाहत्यांना या दोघांची केमिस्ट्री आवडली. त्याचबरोबर यानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्याही खूप वेगाने समोर आल्या. मात्र, दोघेही एकमेकांना आपले चांगले मित्र मानतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अरे बिचाऱ्या मुलांवर जरा दया दाखवा’, राखी सावंतचा आर्यन अन् अनन्याला पाठिंबा

-अनन्या पांडेच्या अडचणीत वाढ; जुने चॅट रिट्रिव्ह करण्यासाठी एनसीबीने जप्त केल्या ‘या’ गोष्टी

-‘हे तुमचं प्रोडक्शन हाऊस नाही’, कार्यालयात उशिरा पोहचल्यामुळे समीर वानखेडेंनी अनन्याला धरलं धारेवर

Latest Post