Tuesday, April 23, 2024

Ananya Panday लवकरच होणार मावशी; बहिण अलानाने बेबी बंप फ्लान्ट करत दिली गुड न्यूज

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अनन्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच तिनं इंस्टावर स्टोरी शेअर करत चाहत्यांन ती मावशी होणार असल्याची गुड न्यूज दिली. तसेच, बहिण अलानाचे मॅटरनिटी शुटचे काही फोटो शेअर केले आहेत.

अनन्या पांडेची (Ananya Panday) चुलत बहीण अलाना पांडे हिने गेल्या वर्षी तिचा बॉयफ्रेंड आयव्हर मॅकक्रेसोबत लग्न केले. आता या जोडप्याच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. म्हणजेच अनन्या पांडे मावशी होणार आहे.

अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना हिने बुधवारी तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या मॅटर्निटी शूटचा व्हिडिओ अपलोड करून तिच्या गरोदरपणाची घोषणा केली आहे. क्लिपमध्ये, अलाना आणि इव्होर जंगलात पोज देत आहेत. अलाना तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दोघेही खुप खुश दिसत आहेत.

अलानाने तिच्या सोनोग्राफीची एक झलकही शेअर केली आहे. व्हिडीओमध्ये अलाना फ्लोरल स्ट्रिंग ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती, तर इव्होर पांढरा शर्ट आणि ट्राउझर्समध्ये दिसला.

बधाई हो! Ananya Panday बनने वाली हैं मौसी, बहन अलाना ने पति इवोर संग अनाउंस की प्रेग्नेंसी, बेबी बंप फ्लान्ट करते हुए शेयर की वीडियो

व्हिडिओ शेअर करताना अलानाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो, तुला पाहण्यासाठी आम्ही अधिक काळ प्रतीक्षा करू शकत नाही.’ अलानाच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना आयव्हरने लिहिले की, “मला माझ्या बाळाला भेटण्याची आतुरता लागली आहे, मी तुझ्यावर प्रेम करतो.” अलाना पांडेच्या प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर अनन्या पांडेने ‘मी मावशी होणार आहे.’ असं सांगत आनंद व्यक्त केला. त्यानंर अनन्या पांडे सह तिची बहीण अलाना हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बधाई हो! Ananya Panday बनने वाली हैं मौसी, बहन अलाना ने पति इवोर संग अनाउंस की प्रेग्नेंसी, बेबी बंप फ्लान्ट करते हुए शेयर की वीडियो

अलाना पांडेचा जन्म १६ ऑगस्ट १९९५ रोजी मुंबई येथे झाला. अलाना ही चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडे आणि फिटनेस इंस्ट्रक्टर डीन पांडे यांची मुलगी आहे. अलानाने गेल्या वर्षी मार्चमध्ये मुंबईत हिंदू रितीरिवाजांनुसार प्रियकर आयव्हरसोबत लग्नबंधनात अडकली.

बधाई हो! Ananya Panday बनने वाली हैं मौसी, बहन अलाना ने पति इवोर संग अनाउंस की प्रेग्नेंसी, बेबी बंप फ्लान्ट करते हुए शेयर की वीडियो

लग्नाला अलानाची चुलत बहीण अनन्या पांडे, चंकी पांडे तसेच रेखा, शाहरुख खान, जॅकी श्रॉफ, बॉबी देओल, नीलम कोठारी, महिमा चौधरी आणि तुषार कपूर यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

आयव्हर हा यूएस स्थित फोटोग्राफर आहे. लग्नापूर्वी, अलाना आणि इव्होर यांनी अनेक वर्षे डेटिंग केली. त्यांचे एक यूट्यूब चॅनल देखील आहे. आणि तो लॉस एंजेलिस, यूएसए येथे राहतो. इन्स्टाग्रामवरही त्याचे फॉलोअर्स मोठ्या संख्येने आहेत.

हे देखील वाचा