Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड प्रेमाच्या रंगात रंगले आदित्य आणि अनन्या, एकत्र केला व्हॅलेंटाईन डे साजरा

प्रेमाच्या रंगात रंगले आदित्य आणि अनन्या, एकत्र केला व्हॅलेंटाईन डे साजरा

14 फेब्रुवारी रोजी जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे. त्याचबरोबर बॉलिवूड स्टार्सही प्रेमाच्या रंगात रंगताना दिसत आहेत. अशाटच बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे मागे कशी राहील? अभिनेत्रीनेही हा खास दिवस तिच्या खाससोबत साजरा केला आहे.

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अभिनेत्रीला तिच्या जोडीदाराकडून खूप सुंदर भेटवस्तूही मिळाल्या आहेत.अनन्याने तिच्या इन्स्टा स्टोरीवर दोन अतिशय सुंदर फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये, अनन्या कारमध्ये हृदयाच्या आकाराचा लाल फुगा हातात धरून बसलेली दिसत आहे.

तर दुसऱ्या फोटोत फुलांचा सुंदर गुच्छ दिसत आहे. हे शेअर करताना अनन्याने हार्ट इमोजीही बनवला आहे. हे सुंदर फोटो पाहिल्यानंतर अनन्या आणि आदित्य रॉय कपूरच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे.

अनन्या पांडे आदित्य रॉय कपूरसोबतच्या नात्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. मात्र, अनन्या आणि आदित्यने अद्याप हे नाते अधिकृत केले नाही. पण दोघेही अनेकदा एकत्र क्वालिटी टाइम घालवताना दिसले आहेत. दोघेही अनेकदा एकत्र व्हेकेशन करताना स्पॉट झाले आहेत.

‘कॉफी विथ करण’मध्येही अनन्याने आदित्यबद्दलच्या तिच्या भावना हावभावातून व्यक्त केल्या होत्या. आता अनन्याची पोस्ट पाहता ती लवकरच तिच्या नात्यावर शिक्कामोर्तब करू शकते असे दिसते.

अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अनन्या लवकरच कॉकटेल 2 मध्ये दिसणार असल्याचे वृत्त आहे. अलीकडेच अनन्या आणि सारा अली खान मॅडॉक फिल्म्सच्या ऑफिसबाहेर दिसल्या. मात्र, प्रोडक्शन हाऊसकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अभिनेत्री शेवटची नेटफ्लिक्स चित्रपट ‘खो गये हम कहाँ’ मध्ये दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

…म्हणून आदित्य नारायणने त्या चाहत्याला मारलं अन् फोन दिला फेकून
‘तुम्ही बदल घडवलात…’शिल्पा शेट्टीने PM मोदींनी लिहिले पत्र

हे देखील वाचा