Sunday, August 3, 2025
Home कॅलेंडर अनन्या पांडेचे मालदीव वेकेशनचे बिकनी फोटो व्हायरल, पाहा कोण काढतंय हे फोटो

अनन्या पांडेचे मालदीव वेकेशनचे बिकनी फोटो व्हायरल, पाहा कोण काढतंय हे फोटो

बॉलिवूडचे कलाकार हे दर वर्षी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी कुठे ना कुठे फिरायला जात असतात. यावरही बहुतेक सेलिब्रिटीज हे मालदीव येथेच नवं वर्ष साजरं करण्यासाठी गेले आहेत. अशात बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे देखील नवीन वर्ष साजरं करण्यासाठी मालदीवमध्ये गेली आहे. अनन्याबरोबर त्याचा खाली-पिली को-स्टार ईशान खट्टरसुद्धा मालदीवला गेला आहे. अनन्याने मालदीवमध्ये एन्जॉय करत असताना बरेच फोटो शेअर केले आहेत. अनन्याने सनफ्लाव्हर बिकिनीमध्ये एक उत्तम हॉट फोटो शेअर केला आहे. जो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे असं फोटोला मिळालेल्या प्रतिक्रियांवरून दिसतंय. मालदीवच्या सुट्टीवर अनन्याचा फोटोग्राफर तीचा तथाकथित बॉयफ्रेंड ईशान तर नाही ना? असा प्रश्न आता तिच्या चाहत्यांना पडू लागला आहे.

https://www.instagram.com/p/CJf0Yp8AFCh/

अनन्याने स्विमिंग पूलमध्ये पोज देत फोटो काढून ते शेअर केले आहेत. ती सनफ्लॉवर बिकिनीमध्ये सर्वांच लक्ष वेधून घेत आहे. अनन्याने हा फोटो शेअर करत सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनन्या मालदीवमध्ये फक्त बिकिनीमधील हॉटनेसचा तडका असलेलेच फोटो शेअर करत आहे. अलीकडेच अनन्याने गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये एक फोटो शेअर केला होता.

दुसरीकडे, ईशान खट्टर देखील मालदीव मध्ये सुट्टीचा मनमुराद आनंद लुटत आहे. फोटोजमध्ये ईशान आपल्याला त्याची शरीरयष्टी दाखवताना दिसत आहे. स्विमिंग पूलमध्ये पुशअप करतांना त्याने एक फोटो शेअर केला आहे. अनन्या आणि ईशान दोघांचेही फोटोज पाहता असं म्हणता येईल की अनन्या आणि ईशान मालदीवमध्ये बरीच मस्ती करत आहेत.

अनन्या आणि ईशानला मालदीवला जाताना एकत्र विमानतळावर स्पॉट केलं गेलं होतं. मालदीवमध्ये देखील दोघेही एकाच ठिकाणचे स्वतःचे सिंगल फोटो शेअर करत आहेत. दोघेही एकमेकांचे फोटो तर काढत आहेत परंतु एकमेकांसोबत फोटो काढून ते शेअर करत नाहीत अशा चर्चा आता माध्यमांमध्ये रंगू लागल्या आहेत. या प्रकारामुळे अनन्या आणि ईशान एकमेकांना डेट तर करत नाहीयेत ना असा प्रश्न दोघांच्याही चाहत्यांना पडला आहे.

येत्या काही काळात अनन्या पांडे ही शकुन बत्राच्या चित्रपटात सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्यासोबत झळकणार आहे तर ईशानदेखील कतरीना कैफ आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबत चित्रपट फोनभूत मध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

हे देखील वाचा