‘तू अगदी मुलांसारखी दिसते’, या वक्तव्याने अनन्याला झाले होते दु:ख, अभिनेत्रीने केला उलगडा

Ananya pande suffered the pain of body shaming, people said she look like a boy


अत्यंत कमी कालावधीत सगळ्यांना आपल्या स्टाईलने चाहता बनवणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे अनन्या पांडे. ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ या चित्रपटातून अनन्याने मोठ्या पडद्यावर प्रवेश केला. ती भलेही एक स्टार कीड म्हणून प्रसिद्ध होती, पण तिने तिच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंगाचा सामना केला आहे. अनन्याने नुकतेच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींचा उलगडा केला आहे.

अनन्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे तिला अनेकवेळा ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला आहे. परंतु यावर अनन्याने सडेतोड उत्तर दिले आहे.

ती म्हणते की, “माझ्या कमजोर शरीरामुळे सगळे मला नेहमीच बोलले आहेत.” तिला अनेेकजण म्हणायचे की, ‘तू अगदी मुलांसारखी दिसते.’ सोशल मीडियावरील काही युजर्सने तर असे देखील म्हटले होते की, ‘तिच्या शरीरात महिलांसारखी कोणतीच गोष्ट नाहीये.’

तिने पुढे असे सांगितले की, “मी एकदा माझ्या आई- वडिलांसोबत सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता, तेव्हा मला कोणीतरी म्हटले होते की, तू अगदी मुलांसारखी दिसते. त्यावेळी मी चित्रपटात काम करत नव्हते. पण मला हे सगळं ऐकून खूपच वाईट वाटलं होतं. कारण आपल्या आयुष्यात तो एक असा काळ असतो की, जेव्हा आपण स्वत:वर विश्वास ठेवायला सुरुवात करतो, स्वत:वर प्रेम करायला सुरुवात करतो. परंतु सगळ्यांचा अशा बोलण्याने माझा स्वतःवरचा विश्वास कमी झाला होता.”

तिच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास, तिने सन २०२० मध्ये रिलीझ झालेल्या ‘खालीपिली’ या चित्रपटात काम केले होते. यामध्ये तिच्यासोबत अभिनेता इशान खट्टरही मुख्य भूमिकेत होता. ती सध्या ‘लायगर’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-…म्हणून जगाचा निरोप घेण्यापूर्वी शत्रुघ्न सिन्हा यांना वाटत होते, राजेश खन्ना यांना मारावी कडकडून मिठी; वाचा ते कारण

-टीव्ही मालिकेत काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री, एका दिवसाचे घेतात जवळपास दीड ते दोन लाख मानधन

-‘बॉम्बे बेगम’ मधून पूजा भट्ट करणार डिजिटल पदार्पण, ‘या’ अभिनेत्रीही साकारणार मुख्य भूमिका


Leave A Reply

Your email address will not be published.