‘बॉम्बे बेगम’ मधून पूजा भट्ट करणार डिजिटल पदार्पण, ‘या’ अभिनेत्रीही साकारणार मुख्य भूमिका


नेटफ्लिक्सवरील बहुचर्चित ‘बॉम्बे बेगम’ ही वेबसीरिज ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीझ झाला होता. ज्यात अभिनेत्री पूजा भट्ट डिजिटल क्षेत्रात पदार्पण करत आहे. ही कथा वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळे आयुष्य जगणाऱ्या पाच महिलांच्या आयुष्यावर आधारित आहे. ज्यांची स्वप्ने व जग हे फार वेगळे आहेत. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणींचा सामना त्या कशा करतात, हे यात दाखवले गेले आहे. शिवाय इतके सर्व असूनही या एकमेकींशी कशा जोडल्या जातात हे या वेबसिरीजचे कथानक आहे.

पूजा भट्टने यात आपली जबरदस्त भूमिका निभावली आहे, हे रिलीझ झालेल्या ट्रेलरवरून पाहावयास मिळतेय. पण तिच्यासोबतच ज्या अभिनेत्री आहेत, त्यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का?, चला तर मग या अभिनेत्रींबद्दल माहिती करून घेऊयात ज्यांनी यात मोलाची भूमिका साकारली आहे.

पूजा भट्ट
प्रथमतः पूजा भट्ट बद्दल बोलायचे झाल्यास तिने १९८९ साली प्रदर्शित झालेल्या ‘डॅडी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नव्वदीच्या दशकातील ती एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. ‘दिल हैं के मानता नही’, ‘सडक’, ‘तडीपार’, ‘बॉर्डर’, ‘तमन्ना’ इत्यादी अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चमक दाखवली आहे. परंतु तिचे हे चित्रपट फारसे प्रभावी ठरले नव्हते. तिने यात एका व्यावसायिकाची भूमिका साकारली आहे. या सीरिजद्वारे ती पुन्हा आपले नशीब आजमावणार आहे. त्यामुळे तिची भूमिका किती प्रेक्षणीय ठरतेय हे पाहणे औसुक्याचे ठरेल.

अमृता सुभाष
पूजा भट्ट सोबतच मराठी अभिनेत्री अमृता सुभाष देखील या सीरिजमध्ये प्रेक्षकांना अभिनय करताना दिसणार आहे. केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटांमध्ये देखील तिने आपल्या अभिनयाची उत्कृष्ट छाप पाडली आहे. अमृताने रणवीर सिंगच्या गल्ली बॉय चित्रपटात आईची भूमिका साकारली होती. सोबतच तिने ‘सेक्रेड गेम्स २ ‘ या वेब सीरिजमध्ये देखील अभिनय केला आहे. बेगम जान या सीरिजमध्ये अमृता बारमध्ये डान्स करणाऱ्या स्त्रीची भूमिका साकारत आहे.

आध्या आनंद
पूजा भट्टच्या मुलीच्या भूमिकेत युवा अभिनेत्री आध्या आनंद आपले नशीब आजमावत आहे. तिची ही पाहिलीच हिंदी वेबसीरीज आहे. याअगोदर ती एका चित्रपटात दिसली होती. जो चित्रपट जोंथन चू यांचा सिंगापूर मध्ये रिलीझ झाला होता. ती या चित्रपटातील पात्रामुळे अधिक चर्चेत आली आहे.

प्लाबिता बोरठाकूर
प्लाबिता बोरठाकूर ही अभिनेत्री तिच्या ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या सीरिजमार्फत प्रेक्षकांना दिसली होती. सोबतच ती अभिषेक बच्चनच्या ‘ब्रीद’ या वेबसीरिजमध्ये अभिनय करताना दिसली होती. आपल्या या वेबसिरीजच्या पात्रामुळे ती अधिक नावारूपास आली आहे.

शहाना गोस्वामी
‘रॉक ऑन’ या चित्रपटात भूमिका साकारणारी शहाना गोस्वामी ही या वेब सीरिजमुळे अधिक चर्चेत येताना दिसत आहे. या अगोदर ती मीरा नायरच्या ‘सुटेबल बॉय’ कार्यक्रमात मीनाक्षी चटर्जी या नावाने अभिनय करताना दिसली होती. याशिवाय तिने “गली गुलीयाा’, ‘रा. वन’, ‘ब्रेक के बाद’ या चित्रपटात काम केले आहे.

या चित्रपटात लेखक आणि दिग्दर्शक अलांकृता श्रीवास्तव यांनी केले आहे. ज्यांनी यापूर्वी ‘डॉली’, ‘लिपस्टिक अंडर माय गुरखा’ आणि ‘किट्टी अँड वो चमकते सितारे’ यांसारख्या चित्रपटाचे लेखन केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आमिर खान आहे खऱ्या मैत्रीचे मूर्तिमंत उदाहरण; ‘लगान’मधील मित्राची ‘ही’ इच्छा केली पूर्ण

-‘द डर्टी पिक्चर’मधील भूमिकेमुळे प्रचंड घाबरली होती ‘विद्या बालन’, स्क्रीनिंगनंतर घडलेले न विसरण्यासारखे

-तब्बल ३० वर्षांनंतर अनुपम खेर यांचे टॉलिवूडमध्ये कमबॅक, बुमराहच्या कथित गर्लफ्रेंडसोबत करणार ‘या’ सिनेमात काम


Leave A Reply

Your email address will not be published.