अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिच्या चित्रपटांची तसेच बोल्ड फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होत असते. अनन्या पांडेने आजपर्यंत तिच्या प्रेम प्रकरणाची जाहीर माहिती दिली नसली, तरी ती ईशान खट्टरसोबत (Ishaan Khattar) रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी समोर आली होती. आता अभिनेत्रीने याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
अभिनेत्री अनन्या पांडे सध्या ‘गहराइयां’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने विशेष यश मिळवले नसले तरी चित्रपटातील अनन्याच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. या चित्रपटात दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यातील बोल्ड सीनची सगळीकडे जोरदार चर्चा झाली होती. त्याचबरोबर ती तिचा कथित प्रियकर ईशान खट्टरसोबत प्रेम प्रकरणामुळे चर्चेत असते. याबद्दल नुकतीच ती एका कार्यक्रमात बोलताना दिसून आली होती. एका मुलाखतीत अनन्याने आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले. यावेळी बोलताना तिला हिंदी चित्रपट जगतातील आघाडीचे अभिनेते ईशान खट्टर, सिद्धांत चतुर्वेदी, सुपरस्टार विजय देवरकोंडा यांना काय सल्ला देशील असे विचारण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री अनन्याने खूपच मजेशीर उत्तर दिले होते.
या प्रश्नाचे उत्तर देताना अनन्याने आपला बॉयफ्रेंड ईशान खट्टरला डान्स शिकण्याचा सल्ला दिला आहे. तर अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीला तिला त्रास न देण्याचा सल्ला दिला आहे. यावर अधिक स्पष्टीकरण देताना तिने सांगितले की, “सिद्धांत आणि मी सतत भांडत असतो. आम्ही टॉम अँड जेरी सारखे आहोत, भांडतो आणि प्रेम ही करतो त्यामुळे मी त्याला माझ्याशी कमी भांडण्याचा सल्ला देते.” तसेच दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाला तिने सगळ्या हिंदी प्रेक्षकांकडून मिळणार्या प्रतिक्रियांचा स्वीकार करण्याचा सल्ला दिला आहे. अभिनेता विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे लवकरच ‘लायगर’ या चित्रपटात सोबत काम करताना दिसणार आहेत.
हेही वाचा –