Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

सलग दुसऱ्या दिवशी एनसीबीच्या ऑफिसमध्ये चौकशीसाठी हजर झाली अनन्या पांडे, वडील चंकी पांडेही होता सोबत

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला रविवारी (३ ऑक्टोबर) एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. अं’मली पदार्थ प्रकरणात त्याचे नाव आल्यामुळे त्याची कसून चौकशी सुरू आहे. मुंबईत या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू आहे. दरम्यान न्यायालयाकडून आर्यनचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला. त्यानंतर त्याची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली.

त्यानंतर गुरुवारी (२१ ऑक्टोबर) बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी एनसीबीने धाड टाकली. तिच्या वांद्रे स्थित घरावर छापा टाकण्यात आल्याचे समोर आले होते. त्याचदिवशी तिला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. (ananya pandey and chunky pandey reached ncb office for questioning for the second consecutive day)

आता सलग दुसऱ्या दिवशी एनसीबीने अनन्याला चौकशीसाठी बोलावले आहे. पहिल्याच दिवशी तिला अनेक खडतर प्रश्न विचारले गेले होते. एनसीबीच्या ऑफिसमध्ये जाताना अनन्या पांढऱ्या सलवार सूटमध्ये दिसली. महत्वाचे म्हणजे, तपासादरम्यान अभिनेत्रीचा लॅपटॉप आणि मोबाईलही जप्त करण्यात आला होता.

माध्यमातील वृत्तानुसार, अनन्याच्या घरात ४ ते ५ तास तपास सुरू होता. खरं तर अभिनेत्रीचे आर्यन खानसोबत काही व्हॉट्सऍप चॅट्स समोर आल्याचे म्हटले जात आहे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी व्ही.व्ही.सिंग यांच्या नेतृत्वाखाली सहा सदस्यीय टीम पहाटे पहाटे अनन्या पांडेच्या घरी पोहोचली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अनन्या पांडे जगातील सर्वात मोठी मूर्ख’, म्हणत ‘या’ स्टारकिडला एनसीबी चौकशीला बोलावण्याचा कमाल खानचा दावा

-एनसीबीकडून आज पुन्हा होणार अनन्या पांडेची चौकशी

-अनन्या शाहरुख खानला म्हणाली होती ‘सेकंड डॅड’, नेमकं प्रकरण काय?

हे देखील वाचा