अनन्या शाहरुख खानला म्हणाली होती ‘सेकंड डॅड’, नेमकं प्रकरण काय?

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे हीदेखील अभिनयात आपला ठसा उमटवत आहे. तिच्या अभिनयासोबतच ती तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. तिचे वडील अभिनेता असल्याने तिला लहानपणापासूनच अभिनयाचे बाळकडू मिळाले आहे. अभिनेत्याची मुलगी म्हटल्यावर तिचा इतर कलाकारांच्या मुलांशीही चांगली मैत्री असणार, यात तिळमात्र शंका नाही. अनन्या आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना तिच्या खास मैत्रिणीपैकी एक आहे. तसेच ती अनेकदा किंग खानच्या आर्यन आणि अबराम या दोन मुलांसोबत वेळ घालवताना दिसते.

खरं तर, अनन्या शाहरुख खानच्या कुटुंबाच्या इतकी जवळ आहे की, तिने शाहरुखला एकदा तिचा ‘सेकेंड डॅड’ (दुसरे वडील) म्हटले होते. सन २०१९ मध्ये तिने किंग खानसोबत आपल्या बाँडिंगबाबत सांगितले होते. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अनन्या म्हणाली होती की, “शाहरुख खान मला माझ्या दुसऱ्या वडिलांप्रमाणे आहेत. ते माझे सर्वात चांगल्या मैत्रिणीचे वडील आहेत. आम्ही एकत्र आयपीएल सामने पाहायला जायचो.” (Ananya Panday Said That Shahrukh Khan Is My Second Dad Suhana Is Close Friend)

“फक्त सुहाना आणि शनायाच इंडस्ट्रीतील माझ्या सर्वात जवळच्या मैत्रिणी आहेत. आम्ही सर्वकाही शेअर करतो,” असेही ती पुढे बोलताना म्हणाली होती. शनाया ही अभिनेते संजय कपूर यांची मुलगी आहे. तीदेखील लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Ananya ???????? (@ananyapanday)

माध्यमांतील वृत्तांनुसार, ‘स्टुडंट ऑफ द इयर २’च्या प्रमोशनदरम्यान अनन्याने खुलासा केला होता की, “आम्ही एकत्र असताना खूप काही विचित्र गोष्टी केल्या आहेत. शाहरुख सर, नेहमी माझा आत्मविश्वास वाढवायचे आणि आमच्यासोबत फोटोशूट करायचे. ते आमचे व्हिडिओही शूट करायचे. तसेच आम्हाला जाणीव करून द्यायचे की, आम्ही खूप चांगले कलाकार आहोत.”

अनन्याने खूप कमी काळात बॉलिवूडमध्ये आपले स्थान बनवले आहे. तिने एका मुलाखतीत कार्तिक आर्यनला आपला क्रश म्हटले होते. कार्तिकसोबत तिने ‘पती, पत्नी और वो’मध्ये काम केले होते. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने चांगलाच गल्ला जमवला होता. या चित्रपटात भूमी पेडणेकरचीही मुख्य भूमिका होता. हा चित्रपट सन १९७८ मध्ये आलेल्या संजीव कुमार यांच्या ‘पती, पत्नी और वो’ या चित्रपटाचा रिमेक होता.

याव्यतिरिक्त अनन्याने ईशान खट्टरसोबत ‘खाली पीली’ या चित्रपटातही काम केले आहे. मात्र, हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे कमाल दाखवू शकला नाही.

अनन्याबद्दल बोलायचं झालं, तर गुरुवारी (२१ ऑक्टोबर) एनसीबीने तिच्या घरावर छापा टाकला होता. यादरम्यान तिला सनन्सही पाठवण्यात आले. त्यानंतर ती एनसीबी कार्यालयात पोहोचली होती. यादरम्यान तिची अं’मली पदार्थावरून चौकशी करण्यात आली. शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) तिला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बॅकलेस की टॉपलेस?’ नव्या आऊटफिटसह अवतरली उर्फी, तर ड्रेस पाहून चाहते पडले गोंधळात

-आर्यन खानला पुन्हा झटका! ‘या’ तारखेपर्यंत राहणार जेलमध्येच, तर व्हॉट्सऍप चॅट्समुळे वाढू शकतात समस्या

-अनन्या पांडेच्या घरी NCB अधिकारी, चौकशीसाठी अभिनेत्रीला समन्स

Latest Post