Sunday, January 12, 2025
Home बॉलीवूड कधी फ्लोरल ड्रेस, तर कधी बिकिनीमध्ये दिसली अनन्या; मालदीवमधील फोटो पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका

कधी फ्लोरल ड्रेस, तर कधी बिकिनीमध्ये दिसली अनन्या; मालदीवमधील फोटो पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका

सध्या काही सेलिब्रिटी हे रुपेरी पडद्यापासून थोडा ब्रेक घेत, आपल्या वैयक्तिक आयुष्याचा आनंद घेताना दिसत आहेत. त्याचबरोबर फिरण्यासाठी कलाकारांचे आवडते ठिकाण हे  मालदीव आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. याच सेलिब्रिटींच्या यादीत अभिनेत्री अनन्या पांडेने देखील आपला नंबर लावला आहे. अनन्या मागील काही दिवसांपूर्वी मालदीव येथे सुट्टी घालवण्यासाठी गेली होती. सुट्टी संपवून परतल्यानंतरही अनन्याचा मूड आणखी तसाच आहे. त्याचबरोबर मालदीवमध्ये काढलेले काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अलीकडेच तिने शेअर केलेले फोटो व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये अनन्या समुद्रकिनाऱ्यावर पिवळ्या रंगाच्या फुलांच्या ड्रेसमध्ये उभी आहे आणि तेथील वातावरणाचा आनंद घेत आहे. (ananya pandey glamorous pictures from maldives viral on internet)ं

त्याचबरोबर या अगोदर तिने मालदीवमध्ये केशरी रंगाच्या बिकिनीमधील फोटो पोस्ट केला होता. या लूकमध्ये अनन्या खूपच हॉट दिसत आहे. अनन्याचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर अनन्या जेव्हा मालदीवला सी प्लेनने पोहचली तेव्हा देखील तिने एक फोटो पोस्ट केला होता. यामध्ये ती सुट्टीचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहे.

त्याचबरोबर अनन्याने मालदीवमधील ब्लॅक बिकिनी टॉपमधील फोटोही पोस्ट केला होता. तिचा हा लुक मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता. अनन्याचा हा लूक पाहून तिचे चाहते अक्षरश: घायाळ झाले. त्याचबरोबर अनन्या आता मुंबईत परतली आहे. तर सुट्टीहून आल्याबरोबर तिने तिच्या ‘खो गए हम कहां’ या पुढील चित्रपटाचे स्क्रिप्ट वाचन सुरू केले आहे. या चित्रपटात ती सिद्धांत चतुर्वेदी आणि गौरव चोप्रासोबत दिसणार आहे.

अनन्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ‘पती पत्नी और वो’ हा देखील चित्रपट केला. यामध्ये अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर देखील मुख्य भूमिकेत दिसून आले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ओह लडकी ऑंख मारे! उर्वशी रौतेलाच्या नजरेच्या बाणाने चाहते झाले पुरते घायाळ

-सतत बदलणाऱ्या मूडमध्ये ‘हा’ आहे बेबोचा ‘फॉरएव्हर मूड’; पोस्ट शेअर करून दिली माहिती

-‘टायगर ३’साठी शूट केले जातायेत जबरदस्त ऍक्शन सीन्स; तुर्कीनंतर आता ‘या’ देशात होणार चित्रपटाची शूटिंग

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा