Thursday, March 5, 2026
Home बॉलीवूड ‘शॉर्ट्सपेक्षा त्याचे खिसेच मोठे!’ अनन्या पांडेचा एअरपोर्ट लूक पाहून नेटकऱ्यांनी साधला तिच्यावर निशाणा

‘शॉर्ट्सपेक्षा त्याचे खिसेच मोठे!’ अनन्या पांडेचा एअरपोर्ट लूक पाहून नेटकऱ्यांनी साधला तिच्यावर निशाणा

बॉलिवूडमध्ये कलाकारांप्रमाणे स्टारकिड्सही तितकेच लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहेत. आपल्या पालकांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी देखील अभिनयक्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. यातीलच एक अभिनेत्री आहे अनन्या पांडे. तिने अगदी कमी कालावधीत बरीच प्रसिद्धी मिळवली आहे. अनन्या खऱ्या आयुष्यात खूपच हॉट आणि ग्लॅमरस आहे. हे आपल्याला तिच्या सोशल मीडियावर एक नजर टाकली की, सहज लक्षात येईल. मात्र कधीकधी तिच्या याच अंदाजामुळे तिला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो.

आजकाल बॉलिवूडचे कलाकार मंडळी मालदीवमध्ये सुट्ट्या घालवताना दिसत आहेत. दरम्यान, अनन्या देखील मालदीवला गेली होती. तिथून ती सतत तिचे हॉट फोटो शेअर करत होती. नुकतीच ती मायदेशी परतली आहे. परंतु मुंबईत येताच तिला ट्रोलिंगचा बळी व्हावे लागले. (ananya pandey wore very short shorts at mumbai airport get trolled)

https://www.instagram.com/reel/CT-CE-IJf5R/?utm_source=ig_web_copy_link

मालदीवमध्ये सुट्ट्या घालवून अनन्या परतली आहे. या दरम्यानचा तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ विमानतळावरील आहे, ज्यावेळी अभिनेत्रीने एक पांढरा क्रॉप टॉप घातला आहे. सोबतच तिने अतिशय लहान शॉर्ट्स घातले आहेत. अनन्याने तिच्या कंबरेला शर्ट बांधला आहे. मात्र अभिनेत्रीच्या या विमानतळावरील लूकला नेटकरी मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. घातलेल्या शॉर्ट्सपेक्षा त्याचे खिशे मोठे असल्याने नेटकरी तिला टोमणे मारत आहेत. काहीजण तर तिच्याकडे घालायला योग्य कपडे नसतील, असेही म्हणत आहेत.

 

अनन्या पांडेने तिच्या करिअरची सुरुवात ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ मधून केली होती. त्यानंतर ती ‘पती पत्नी और वो’ आणि’ खली पीली’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. अनन्या पांडेने नुकतेच शकुन बत्रा यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. अनन्या व्यतिरिक्त दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी देखील या चित्रपटात दिसणार आहेत. याशिवाय, अनन्याने अलीकडेच तिच्या ‘खो गये हम कहां’ चित्रपटाची घोषणा केली आहे. झोया अख्तर निर्मित या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बोले तो एकदम कडक!’ अरशद वारसीचे ‘बॉडी ट्रान्सफॉर्मेशन’ पाहून थेट जॉन सीनाशी केली जातेय तुलना

-‘बिग बॉस १५’साठी सलमान खान घेतोय ‘इतकी’ रक्कम; कोटीच्या मानधनामुळे अभिनेता आला ट्रोलर्सच्या निशाण्यावर

-भारीच ना! निशांत अन् शमिताला धूळ चाखवत दिव्या ठरली ‘बिग बॉस ओटीटी’ची उपविजेती

हे देखील वाचा