Monday, July 1, 2024

‘अंधेरे सें कह दो…’ म्हणत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने केला अनोखा फोटो शेअर; इंटरनेटवर रंगली एकच चर्चा!

टीव्हीवर सतत वेगवेगळ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. काहींना प्रेक्षकांची पसंती मिळते, तर काही मालिका प्रेक्षकांना खास प्रभावित करू शकत नाहीत. मात्र, झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले. यातील कलाकारांनाही बरीच लोकप्रियता मिळाली. त्यातीलच एक आहे ‘शेवंता’ अर्थातच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर.

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. ती सतत आपले व्हिडिओ आणि फोटो शेअर करून, चाहत्यांचे लक्ष वेधत असते. चाहतेही तिच्या फोटोवर प्रेम व्यक्त करताना दिसतात. नुकताच तिने पोस्ट केलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

अपूर्वाने हा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यात तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेला पाहायला मिळत आहे. सोबत घातलेले दागिने आणि नाकातील नथ तिच्या सुंदरतेमध्ये आणखी भर घालत आहेत. हा फोटो शेअर करत तिने एक कॅप्शनही लिहिले आहे, जे सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

फोटोच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले की, “अंधेरे सें कह दो बचपन बीत चूका हैं, अब तुझसे डर नहीं सुकून मिलता हैं.” नेहमीप्रमाणे अपूर्वाच्या या फोटोलाही चाहत्यांची पसंती मिळत आहे. चाहत्यांनी कंमेट्सच्या माध्यमातून तिचे कौतुक करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. कमेंट बॉक्समध्ये लाल हार्ट आणि फायर ईमोजीचा पाऊस पाडलेला पाहायला मिळत आहे.

अपूर्वाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘आभास हा’ या मालिकेद्वारे टीव्हीवर पदार्पण केले होते. त्यानंतर अभिनेत्रीने बऱ्याच मालिकेमध्ये भूमिका साकारल्या. मात्र, तिला खरी ओळख ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने मिळवून दिली. याशिवाय अपूर्वाने ‘भाकरखाडी ७ किमी’, ‘इश्क वाला लव्ह’, ‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’, आणि ‘सब कुशल मंगल’ या चित्रपटातही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा