Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड सलमानला ५ एप्रिल रोजी पुन्हा कोर्टात हाजीर हो…! पण यावेळी काळवीट नाही तर दुसरंच प्रकरण…

सलमानला ५ एप्रिल रोजी पुन्हा कोर्टात हाजीर हो…! पण यावेळी काळवीट नाही तर दुसरंच प्रकरण…

बॉलिवूडचा दबंग खान हा जितका त्याच्या चित्रपटांसाठी, चित्रपटाच्या कमाईच्या वेगवेगळ्या रेकॉर्डसाठी ओळखला जातो तेवढाच तो त्याच्या इंडस्ट्रीमधील किंवा इंडस्ट्रीबाहेरील भांडणामुळे देखील ओळखला जातो. सलमान खान म्हणजे सध्या यशस्वी सिनेमाची ग्यारंटी झाली आहे. मात्र असे असले तरी तो त्याच्या वादांमुळे आणि त्याच्या कोर्टकेसमुळे सुद्धा मीडियामध्ये गाजताना दिसतो. सलमानवर अनेकदा त्याच्या विचित्र वागणुकीमुळे तक्रारी दाखल होत असल्याचे आपण ऐकले असेल. अशीच एक तक्रार एका पत्रकाराने त्याच्यावर केली होती, आता त्याला कोर्टाने केसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

सलमान खानला (Salman Khan) पत्रकारासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी अंधेरी कोर्टाने ५ एप्रिल रोजी कोर्टात उपस्थित राहण्यासाठी समन जरी केले आहे. २०१९ साली सलमान खानवर पत्रकार अशोक पांडे (journalist Ashok Pandey) यांनी गैरवर्तवणुकीचा आरोप करत केस दाखल केली होती. कोर्टाने सलमान खानवर या केसमध्ये आयपीसी कलम ५०४ आणि ५०६ अंतर्गत समन जरी केले आहे. याबद्दल एएनआय या वृत्तसंस्थने ट्विट करत माहिती दिली आहे.

पत्रकार अशोक पांडे यांनी त्यांच्या तक्रारवत सांगितले की, २४ एप्रिल २०१९ रोजी ते जुहू ते कांदिवली दरम्यान त्यांच्या कॅमेरामॅनसोबत गाडीत बसून जात होते. मधेच त्यांना सलमान खान सायकलिंग करताना दिसला. त्यामुळे त्यांनी सलमान खानचा व्हिडिओ बनवण्यासाठी त्याच्या बॉडीगार्डकडून परवानगी देखील घेतली. त्यानंतर जेव्हा सलमान खानने त्यांना व्हिडिओ बनवताना पाहिले तेव्हा त्याला ते अजिबात आवडले नाही आणि त्याचा विरोध केला. त्यानंतर सलमान खानच्या बॉडीगार्डने त्याच्यासोबत मारहाण केली. एवढेच नाही तर सलमान खानने देखील त्याला मारले आणि त्यांचा फोन हिसकावून घेतला. यानंतर अशोक पांडे यांनी सलमान विरोधात तक्रार दाखल केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा