Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड नाद करायचा न्हाय! रागाच्या भरात धर्मेंद्र यांनी धरली होती राजकुमार यांची कॉलर, वाचा काय घडले होते नक्की?

नाद करायचा न्हाय! रागाच्या भरात धर्मेंद्र यांनी धरली होती राजकुमार यांची कॉलर, वाचा काय घडले होते नक्की?

बॉलिवूडचे ‘ही मॅन’ धर्मेंद्र आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. आजवर धर्मेंद्र यांनी सर्व प्रकारचे चित्रपट चाहत्यांसमोर सादर केले आहेत. आपल्या शानदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी आजपर्यंत सर्वांना वेड लावले आहे. धर्मेंद्र आपल्या उदारपणासाठी देखील ओळखले जातात. पण हेही खरं आहे की, जेव्हा त्यांना राग येतो, तेव्हा ते कुणाचेही ऐकत नाही. धर्मेंद्र यांचा राग एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिसला होता.

‘काजल’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानची एक घटना बरीच प्रसिद्ध आहे. या चित्रपटात धर्मेंद्र यांच्याशिवाय राजकुमार आणि मीना कुमारी मुख्य भूमिकेत होते. त्यावेळी राजकुमार हे एक प्रसिद्ध अभिनेता झाले होते, तर धर्मेंद्र  हे बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत होते. या चित्रपटाच्या दरम्यान धर्मेंद्र आणि राजकुमार यांच्यात तणाव निर्माण झाला होता. इथे काय किस्सा घडला होता हे जाणून घ्या.

जेव्हा चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले, तेव्हा संपूर्ण स्टारकास्टने कामाला सुरूवात केली होती. पण जेव्हा धर्मेंद्र चित्रपटाच्या सेटवर आले, तेव्हा राजकुमार काही कारणास्तव त्यांची चेष्टा करायला लागले होते. असे म्हटले जाते की, त्यावेळी धर्मेंद्र यांची खिल्ली उडवताना, राजकुमार म्हणाले होते की, ‘कोणत्या ताकदवान व्यक्तीला आणले आहे, अभिनय करायचा की कुस्ती.’ हे ऐकून धर्मेंद्र यांना खूप वाईट वाटले होते. पण राजकुमारसुद्धा कुठे एवढ्यात शांत बसणार होते.

असे म्हटले जाते की, यानंतर ते धर्मेंद्र यांच्यावर खूप हसले होते. त्यानंतर धर्मेंद्र यांना आपला राग अनावर झाला होता. संतप्त झालेले धर्मेंद्र, हे राजकुमार यांच्याजवळ गेले, आणि हे सर्व न करण्यास सांगितले होते. त्यावेळी तर रागाच्या भरात धर्मेंद्र यांनी अगदी राजकुमार यांची कॉलरही धरली होती.

धर्मेंद्र जेव्हा राजकुमार यांच्याबरोबर असे वागले होते, तेव्हा सेटवर सर्वांनाच धक्का बसला होता. यानंतर राजकुमारही खूप चिडले होते. रागाच्या भरात त्यांनी चित्रपट सोडला, आणि सेटही सोडला होता. तथापि, नंतर त्याच कलाकारांसह हा चित्रपट पूर्ण झाला होता. राजकुमार आणि धर्मेंद्र यांच्या अशा अनेक कथा चाहत्यांसमोर येत असतात.

राजकुमार सहसा कलाकारांना, चुकीच्या नावाने हाक मारत असत, हे धर्मेंद्र यांना कदाचित त्यावेळी माहित नव्हते. काजल चित्रपटाशिवाय धर्मेंद्र आणि राजकुमार यांनी ‘राज तिलक’मध्ये काम केले होते. मात्र, या दोघांमधील विनोदाची चर्चा संपली होती.

धर्मेंद्र आजकाल आपल्या फॉर्म हाऊसमध्ये राहत आहेत. पण ते अजूनही चित्रपटांशी जोडले आहेत. लवकरच ते त्यांच्या आगामी २ चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत मुलगा सनी देओल, बॉबी देओल आणि नातू करण देओलही दिसणार आहेत. कोरोनामुळे सध्या चित्रपटाचे शूटिंग थांबले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खानसोबत लग्नबंधनात अडकणार होती रेखा, अभिनेत्रीची आई कुंडली घेऊन थेट पोहोचली होती ज्योतिषीकडे

-‘चित्रपटसृष्टीमध्ये होतो लिंगभेद’, अभिनेत्री दिया मिर्झाचा फिल्म इंडस्ट्रीवर मोठा आरोप

-‘दिल बेचारा’ चित्रपटातील काही सीनमध्ये नव्हता सुशांतचा आवाज; अभिनेत्याच्या मृत्यूनंतर ‘या’ RJ ने केली होती डबिंग

हे देखील वाचा