Saturday, March 28, 2026
Home टेलिव्हिजन ‘भाबीजी घर पर हैं’ मधील तिवारीजींचा नवा लुक, रॅम्पवर अंगूरी भाभीच्या नवऱ्याचा जलवा, व्हिडिओ व्हायरल

‘भाबीजी घर पर हैं’ मधील तिवारीजींचा नवा लुक, रॅम्पवर अंगूरी भाभीच्या नवऱ्याचा जलवा, व्हिडिओ व्हायरल

टेलिव्हिजन विश्वामध्ये अशा अनेक मालिका आहे ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. अशीच एक सिरीयल म्हणजे  ‘भाभीजी घर पर हैं’ ही आहे.  यातील कथा आणि कलाकांराच्या अभिनयाने या मालिकेने प्रचंड नाव मिळवले आहे.  तर यातील कलाकांराही या त्यांनी साकारलेल्या पात्राच्या नावानेच ओळखले जात आहे. हा शो 2 मार्च 2015 रोजी सुरू झाला आहे. आणि आता हा शो 11 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ‘भाभीजी घर पर हैं 2.0’ मध्ये कथानक पूर्वीप्रमाणेच आकर्षक आणि रोमांचक आहे, पण या शोमध्ये काही नवीन चेहरेही दिसत आहेत. अंगूरी भाभी आपल्या सौंदर्याने वर्चस्व गाजवत असताना, त्यांचे ऑन-स्क्रीन पती तिवारीजी यांचा नवीन लुक  चर्चेत आहे.

‘भाभीजी घर पर हैं’ मधील तिवारीजींच्या भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या रोहिताश्व गौर यांचा नवीन लुक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. त्यांचा नवीन लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. तिवारीजी म्हणून आपल्या उत्साही शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या रोहिताश्व गौरने मंचावरील आपल्या रॅम्प वॉकने चाहत्यांना थक्क केले आहे. शेरवानी परिधान करून, अभिनेत्याने रॅम्प वॉक केला.

रोहिताश्व गौरचा (gour)हा रॅम्प वॉक व्हिडिओ एका चॅरिटी इव्हेंटमधील आहे, ज्यात तो सहभागी झाला होता. आपला व्हिडिओ पोस्ट करताना त्याने लिहिले, “‘बेटी चॅरिटी’ इव्हेंटसाठी रॅम्प वॉक करणे हा एक सन्मान आहे. तर रोहिताश्व गौर हा एक प्रसिद्ध अभिनेता आहे, जो आपल्या अविस्मरणीय विनोदी भूमिकांसाठी ओळखला जातो. ‘भाभीजी घर पर हैं, या सिटकॉममध्ये मनमोहन तिवारीची भूमिका साकारल्याबद्दल तो खूप काळापासून लोकप्रिय आहे.

‘कमबॅक किंग’ म्हणून गाजलेला स्टारकिड, तर याने दमदार भूमिकांनी हिरोलाही टाकलं होत मागे

हे देखील वाचा