Sunday, June 22, 2025
Home वेबसिरीज ‘थार’ सिनेमात झळकणार अनिल कपूर, हर्षवर्धन ही बापलेकाची जोडी, सस्पेन्सने भरपूर सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

‘थार’ सिनेमात झळकणार अनिल कपूर, हर्षवर्धन ही बापलेकाची जोडी, सस्पेन्सने भरपूर सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

अनिल कपूर यांचा मुलगा असलेल्या हर्षवर्धन कपूरने २०१६ साली ‘मिर्जा’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र त्याला काही जास्त यश मिळाले नाही. आता पुन्हा एकदा हर्षवर्धन एका सिनेमातून त्याच्या वडिलांसोबत अनिल कपूर यांच्यासोबत झळकणार आहे. आगामी ‘थार’ या सिनेमातून ही बापलेकाची जोडी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार असून नुकताच या सिनेमाचं ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

या थ्रिलर सिनेमात अनिल कपूर, हर्षवर्धन कपूर यांच्यासोबत फातिमा शेख देखील महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. हा सिनेमा येत्या ६ मेपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार असून चित्रपटाचे दिग्दर्शन राज सिंह चौधरी यांनी केले आहे. या सिनेमात अनिल कपूर एका प्लॉस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत तर हर्षवर्धन एका स्मग्लरच्या भूमिकेत दिसणार आहे.

नेटफ्लिक्सने प्रदर्शित केलेल्या ‘थार’ या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये सुरुवातीला एका वाळवंटात अनिल कपूर यांची टीम एका हत्येची चौकशी करताना दिसते. नंतर लगेच यात हर्षवर्धनची एन्ट्री होते, जो या सिनेमात एक अँटिक व्यावसायिक आहे. लगेचच सिनेमात सस्पेन्स दिसण्यास सुरुवात होते. तर फातिमा एका राजस्थानी मुलीची भूमिका साकारत आहे. जी हर्षवर्धनच्या व्यक्तिमत्वावर खूपच प्रभावित होते. या ट्रेलरमध्ये अनेक ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळत असून ट्रेलरवरून हा सिनेमा अतिशय चांगला आणि उत्तम असल्याचे दिसत आहे.

अनिल कपूर यांची मुलगी असलेल्या सोनम कपूरने देखील या सिनेमाचा ट्रेलर तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा ट्रेलर शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “हा सिनेमा कोणत्याही वाईट व्यक्तीबद्दल नाही. कदाचित यासर्व गोष्टींमागे कोणत्या चांगल्या व्यक्तीचा हात असावा. नाहीतर कोणाला माहित? या घटनांमागे हिरोईन असेल? ‘थार’ ६ मेला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.”

जेव्हा अनिल कपूर यांना हर्षवर्धनसोबत काम करण्याचा अनुभव विचारला तेव्हा ते म्हणाले, “मला तरुण मुलांसोबत आणि नवीन प्रतिभेसोबत काम करायला आवडते. ‘थार’ सिनेमात तरुण अभिनेत्यांसोबत आणि निर्मांत्यांसोबत काम केल्यामुळे या सिनेमाला एक नवीन दिशा मिळाली. नेटफ्लिक्सवर एके वर्सेस एके नंतर आता मी ‘थार’ स्ट्रीम होण्याची वाट बघत आहे.” सध्या यूटुबवर आणि सोशल मीडियावर ‘थार’चा ट्रेलर चांगलाच गाजत असून लोकांचा त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा