पतीला अद्दल घडवण्यासाठी पूनम ढिल्लो यांनी केले ‘असे’ काही, स्वतःचेच आयुष्य झाले बरबाद


अभिनेत्री पूनम ढिल्लो यांच्या सौंदर्याची तर सगळी दुनिया दीवानी आहे. वयाच्या केवळ १६ व्या वर्षी त्यांनी फेमिना मिस इंडियाचा पुरस्कार जिंकून सर्वत्र नाव कमावले होते. त्यांनी ‘त्रिशूळ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, परंतु त्यांना खरी ओळख ‘नुरी’ या चित्रपटातून मिळाली होती. त्यांनी अगदी कमी वयात अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले होते. चित्रपटाव्यतिरिक्त त्यांनी थिएटर, टेलिव्हिजनमध्ये काम केले आहे. त्यांच्या करिअरसोबत त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात चर्चेत होत्या. त्यांच्या आयुष्यात त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले आहेत.

पूनम यांनी ८०- ९० च्या दशकात जवळपास सगळ्याच अभिनेत्यांसोबत काम केले आहे. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यापासून ते सनी देओल आणि कमल हसन यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. त्यांचे नाव अनेक दिग्गज दिग्दर्शकांसोबत जोडले होते. पहिले नाव तर दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचे होते. यानंतर नावाजलेले चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्याशी असणाऱ्या अफेअरमुळे त्या चर्चेत होत्या. (Poonam Dhillon personal life was full of adversity read throwback story)

माध्यमातील वृत्तानुसार, पूनम ढिल्लो यांना राज सिप्पी खूप आवडत होते. परंतु राज आधीच विवाहित होते त्यामुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही. राज हे देखील पूनमवर प्रेम करत होते, परंतु त्यांच्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर त्यांनी दुसरे लग्न करण्याचे धाडस केले नाही. चित्रपटात प्रेमाचा इतिहास रचणाऱ्या पूनम यांची खऱ्या आयुष्यातील प्रेमकहाणी मात्र अयशस्वी राहिली. अशातच त्याच्या आयुष्यात अशोक ठाकरीया आले.

ते दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांना प्रेम झाले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांना खूप समजावले परंतु त्यांनी कोणाचेही काहीही ऐकले नाही आणि अशोक यांच्याशी लग्न केले. लग्नाला एकच वर्ष झाले आणि त्यांच्या नात्यात कटुता निर्माण झाली. अशोकबाबत अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या आणि त्या हैराण झाल्या होत्या.

माध्यमातील वृत्तानुसार पूनम यांनी त्यांच्या पतीला अद्दल घडवण्यासाठी एक वेगळा मार्ग निवडला किंवा असे पण म्हणू शकतो की, या लग्नात मिळालेल्या धोक्यामुळे त्या दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित झाल्या. त्याचे हाँगकाँगच्या एका व्यावसायिकासोबत अफेअर चालू होते.

लग्नाच्या ९ वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला, परंतु नंतर त्यांनी इतर कोणत्याही पुरुषाशी लग्न केले नाही. त्यांनी त्यांच्या दोन मुलांचे पालन एकटीने केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रभास अन् पुजा हेगडेचा ‘राधे श्याम’ रिलीझपूर्वीच लीक! ‘अशी’ काहीशी आहे चित्रपटाची कथा

-दहावीत असताना होती पहिली गर्लफ्रेंड, चित्रपटांप्रमाणेच रंगतदार होती कार्तिक आर्यनची लव्हलाईफ

-अरे वा! अखेर ‘देवमाणूस’चा पुढचा भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर प्रोमो व्हायरल


Latest Post

error: Content is protected !!