Thursday, February 20, 2025
Home बॉलीवूड प्रॅन्क कॉलने सुरु झाली अनिल आणि सुनीता यांची प्रेमकहाणी, ‘या’ अटीवर झाले लग्न

प्रॅन्क कॉलने सुरु झाली अनिल आणि सुनीता यांची प्रेमकहाणी, ‘या’ अटीवर झाले लग्न

बॉलिवूडच्या (bollywood) जगात तुम्ही अनेक नाती बनताना आणि बिघडताना पाहिली असतील. पण इंडस्ट्रीत असे स्टार्सही आहेत ज्यांचे एकमेकांवर मनापासून प्रेम आहे. असेच एक बॉलीवूड कपल आहे, ज्याने जगाला खऱ्या अर्थाने प्रेमाचा अर्थ सांगितला आहे. या जोडप्याच्या नात्याची खास गोष्ट म्हणजे त्यांचे नाते मीडियाच्या नजरेच्या पलीकडे होते. आम्ही बोलत आहोत बॉलिवूडचा ‘मिस्टर इंडिया’ अनिल कपूर (anil kapoor) आणि त्याची पत्नी सुनीता कपूर ( sunita kapoor) यांच्याबद्दल. एका प्रँक कॉलने सुरू झालेली त्यांची प्रेमकहाणी आज सर्वांसाठी एक उदाहरण बनेल, हे कुणास ठाऊक. आज म्हणजेच १९ मे २०२२ रोजी हे जोडपे त्यांच्या लग्नाचा आज वाढदिवस साजरा करत आहेत. या खास निमित्ताने आम्ही तुम्हाला अनिल आणि सुनीताची रोमँटिक लव्हस्टोरी सांगणार आहोत.

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक, अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात एका प्रँक कॉलने झाली. अनिलच्या मित्राने सुनीतासोबत चेष्टा करण्यासाठी तिला तिचा नंबर दिला होता. पण सुनीताचा आवाज पहिल्यांदा ऐकल्यावर अनिल तिच्या प्रेमात पडला. या कॉलनंतर दोघेही एका पार्टीत भेटले, जिथे दोघे पहिल्यांदा आमनेसामने आले. यानंतर हळूहळू दोघांमध्ये संवाद वाढला, दोघांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले ते कळलेच नाही. अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांना यावेळी समजले की ते एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत.

यानंतर अनिल कपूर आणि सुनीता कपूर एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवू लागले. अनिल तिच्या फोटोशूटदरम्यान अनेकदा सुनीताला भेटायला जायचा. प्रसिद्ध मॉडेल असल्याने सुनीता अनेकदा परदेशात जायची पण दोघांनीही आपल्या नात्यावर याचा परिणाम होऊ दिला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे जोडपे लग्नाच्या आधी जवळपास ११ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. अनिल कपूरच्या म्हणण्यानुसार, दोघांनी स्वतःहून डेट करायला सुरुवात केली होती, त्याने सुनीताला कधीच त्याची गर्लफ्रेंड होण्यास सांगितले नाही.

ज्या वेळी अनिल कपूर इंडस्ट्रीत स्वत:साठी एक स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत होता, तेव्हा सुनीता ही एक मॉडेल होती. पण तिने अनिलची साथ सोडली नाही आणि प्रत्येक पावलावर साथ दिली. त्यावेळी अनिल कपूरकडे कॅबचे बिल भरण्यासाठीही पैसे नव्हते, तेव्हा सुनीता त्यांना पैसे द्यायची.

अनिलच्या संघर्षाच्या दिवसांत सुनीताने त्याला साथ देऊन त्यांचे नाते घट्ट केले होते. अनिलने मनातल्या मनात तिच्याशी लग्न करायचं ठरवलं होतं पण त्याने सुनीताला कधीच प्रपोज केलं नाही. पण चित्रपटांमध्ये पहिला ब्रेक मिळताच अनिल स्वत:ला रोखू शकला नाही. अनिलने १७ मे रोजी ‘मेरी जंग’ हा पहिला चित्रपट साइन केला आणि दुसऱ्याच दिवशी १८ मे रोजी सुनीताला लग्नासाठी प्रपोज केले.

अनिल सुनीताला फोन करतो आणि म्हणतो, “उद्या लग्न करू – उद्या नाही तर कधीच नाही.” सुनीता कपूरने हो म्हटलं पण एक अट होती की ती कधीही स्वयंपाकघरात पाऊल ठेवणार नाही. अनिलने ही अट मान्य केली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ मे १९८४ रोजी जवळपास १० लोकांच्या उपस्थितीत लग्न केले.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

“मला चित्रपटात काम करायचे नव्हते तसे करायचे असते तर….” मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने केला होता करियरबद्दल खुलासा

आईच्या भूमिकेतील रीमा लागू यांचा दमदार अभिनय पाहून इनसिक्योर झाल्या होत्या श्रीदेवी, उचललं ‘हे’ मोठं पाऊल!

हे देखील वाचा