अभिनेत्री सोनम कपूर हिने यावर्षी मार्चमध्ये, आपल्या गरोदरपणाची गोड बातमी दिली आहे. त्यानंतर, अनेकदा तिने बेबी बंप सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंना चाहत्यांनी खास पसंती दिली आणि ते प्रचंड व्हायरल झाले. अशातच, सोनमचा आणखी एक फोटो अतिशय वेगाने वायरल होत आहे. या फोटोत सोनम हॉस्पिटलच्या बेडवर आहे आणि तिच्या हातात एक नवजात बाळ दिसत आहे. हा फोटो पाहताच चाहते सोनमचे आई बनण्यासाठी अभिनंदन करत आहेत आणि बाळाला आशीर्वाद देत आहेत.
सोनमचा हा फोटो अगदी खरा वाटत आहे, परंतु वास्तविक तो मोर्फ किंवा एडिट केलेला आहे, असे समजते. एकूणच काय तर तिची डिलिव्हरी झाली आहे हे सत्य नाही. सोनम कपूर आणि आनंद आहूजा हे २०१८साली विवाहबंधनात अडकले. त्यानंतर, या वर्षी मार्चमध्ये दोघांनी सोशल मीडियावर घोषित केले की, लवकरच ते आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत. सोनमच्या डोहाळे जेवणाचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.
(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)