बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रणौत (kangana Ranaut) ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. दरवेळा याची कारणे वादग्रस्त असतात, पण यावेळी ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ही चर्चा आहे कंगना रणौतच्या लग्नाची…
कंगना रणौतच्या प्रेमात एक अभिनेता इतका वेडा झाला आहे की, तो त्याच्या पत्नीला देखील सोडायला तयार आहे.
कंगनाच्या प्रेमाचे वेड लागलेला हा अभिनेता त्याच्या चिरतारुण्यासाठी ओळखला जातो. आता हे ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. जो अभिनेता कंगनावर भाळला आहे, त्यांचे नाव आहे अनिल कपूर (Anil Kapoor)!
एका मुलाखतीत अरबाज खानने अनिल कपूर यांना विचारले की, त्यांच्या तरुणपणाचे रहस्य काय आहे? यावर अभिनेता म्हणाले की, “मला वाटते की देवाने आपल्याला दिलेल्या जीवनाचा आनंद घ्यावा. देवाच्या कृपेने आणि आशीर्वादामुळे जीवन चांगले चालले आहे. आपल्या सर्वांकडे २४ तास असतात. कामातून वेळ काढून स्वतःसाठी किमान १ तास काढायला हवा आहे.”
पत्नीला देऊ शकतात घटस्फोट
अनिल कपूर यांनी स्वत: अशा अभिनेत्रीबद्दल सांगितले, जिच्या प्रेमात ते वेडे आहेत आणि जिच्यावर ते जीव ओवाळून टाकतात. ती त्यांना इतकी आवडते की, ते स्वतःच्या पत्नीला घटस्फोट देखील देऊ शकतात. ती अभिनेत्री इतर कोणी नसून कंगना रणौत आहे. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये अनिल कपूर यांनी हा खुलासा केला होता. या शोमध्ये करणने अनिल कपूर यांना प्रश्न विचारला होता की, अशी कोणती महिला आहे जिच्यासाठी तुम्ही तुमच्या पत्नीला सोडू शकता. यावेळी अनिल कपूर यांनी मस्करीमध्ये कंगनाच्या नावाकडे इशारा केला होता.
कंगना रणौत
कंगना रणौत या सर्व प्रकरणांवर अद्यापही व्यक्त झाली नाही. अभिनेत्री आजकाल खूप व्यस्त असते. एका पाठोपाठ एक अनेक चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण करण्यात ती व्यस्त आहे. आगामी काळात ती ‘धाकड’ आणि ‘तेजस’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. कंगनाचा ‘थलायवी’ नुकताच रिलीझ झाला आहे. पण तिचा हा चित्रपट अपेक्षेपेक्षा कमीच कामगिरी करू शकला.
हेही वाचा-