Wednesday, December 6, 2023

चिंतेत असलेल्या अनुष्का अन् विराटने मीडिया अन् चाहत्यांकडे केली ‘ही’ विनंती, पोस्ट व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) मागील काळात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर निघाले असताना, काही फोटोग्राफर्सने त्यांची मुलगी वामिकाचे फोटो काढले होते. जे सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यामुळे विराट-अनुष्का खूप चिंतेत दिसत होते. दरम्यान, अभिनेत्री अनुष्काने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत वामिकाचा फोटो व्हायरल होऊ न देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर जे लोक त्यांच्या चिमुकलीचे फोटो व्हायरल करण्यात मग्न आहेत त्यांना विनंतीही करण्यात आली आहे.

अनुष्काने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “आम्ही भारतीय पॅपराजी आणि सर्व मीडिया हाऊसचे आभारी आहोत, ज्यांनी आमच्या मुलीचे फोटो पब्लिश केले नाहीत. पालक म्हणून आमची त्यांना एकच विनंती करत आहोत की, आम्हाला सपोर्ट करा.” (Anushka sharma appeal to her fans and paparazzi for not posting vamika photo)

विराट कोहली आणि अनुष्काच्या वतीने सांगण्यात आले की, त्यांना त्यांच्या मुलाची प्रायव्हसी जपायची आहे. जेणेकरून ते त्यांचे आयुष्य मोकळेपणाने जगू शकतील. ते म्हणाले, “आता ती मोठी होत असताना, आम्ही तिला थांबवू शकत नाही, त्यामुळे तुमच्या पाठिंब्याची गरज आहे.” सोबतच ज्यांनी समंजसपणा दाखवला, त्या सर्व फॅन पेजचे अनुष्काने आभार मानले आहेत.

Photo Courtesy: Instagram/anushkasharma

भारताला दक्षिण आफ्रिकेत तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्यातील पहिला सामना २६ डिसेंबरपासून जोहान्सबर्ग येथे होणार आहे. भारताने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. विराट कोहलीला त्याच्या नेतृत्वाखाली हा इतिहास बदलायला नक्कीच आवडेल.

हेही वाचा-

हे देखील वाचा