Monday, July 1, 2024

बॉलिवूड सुपरस्टार अनिल कपूरने शर्टलेस फोटो केले शेअर; बॉडी पाहून ऋतिक- रितेशही झाले फिदा

बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता अनिल कपूर आपल्या फीटनेससाठी नेहमीच चर्चेत असतो. आपल्या फीटनेसमुळे तो नेहमीच युवा अभिनेत्यांना प्रभावित करतो. तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तो वर्कआऊट सेशनचे फोटो शेअर करत लोकांना प्रेरित करतो. त्याने नुकतेच बीचवरील आपले फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो शर्टविना दिसत आहे.

अनिल कपूरने ६३ व्या वयातील शेअर केलेल्या या फोटोत तो एकदम फीट दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहे. हे फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “हे वडील ज्ञान देत नाहीत, फक्त आपले कपडे काढून समुद्राच्या किनाऱ्यावर चालतात. प्रत्येकाचा एक विक पॉईंट असतो. आणि माझा विक पॉईंट अन्न आहे.

“माझ्यातील पंजाबी मुलाला जागृत करण्याची आवश्यकता आहे. माझे डोळे नेहमी माझ्या पोटापेक्षा मोठे असतात. लॉकडाउन दरम्यान, मी एक नवीन आणि शार्प लूक मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. हा नवा लूक खाण्याकडे माझा एक नवीन दृष्टीकोन असेल. हर्ष आणि माझा ट्रेनर मार्क यांनी माझ्या खाण्याच्या योजनांचे अनुसरण करण्याची आठवण करून देण्यासाठी ही जबाबदारी घेतली आहे,” असेही त्याने पुढे लिहिले.

अनिल कपूरच्या या पोस्टवर अनेक बॉलिवूड अभिनेते प्रतिक्रिया देत आहेत. ऋतिक रोशन, रितेश देशमुख आणि अर्जुन कपूरसारख्या अभिनेत्यांनी या पोस्टवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

इतकेच नव्हे, तर अनिल कपूरच्या मुलींनीही इमोजीच्या माध्यमातून आपल्या वडिलांच्या फोटोंवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

वाचा-

-अभिनेता संजय दत्तची कॅन्सर वर मात, या भावनिक पोस्ट द्वारे दिली माहिती!

-रोहित शेट्टी आणि रणवीर सिंगची जोडी पुन्हा एकदा दिसणार मोठ्यापड्यावर

हे देखील वाचा