बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने नुकतेच सोशल मीडियावर माहिती देत हे सांगितले की त्याने आजरीवर मात केली आहे आणि आता बरा झाला आहे. स्रोतांनुसार संजय दत्तला फुफुसाचा कर्करोज झाला होता.
११ ऑगस्ट २०२० ला श्वासोच्छवासाची समस्या आणि छातीतील अस्वस्थतेमुळे संजू बाबाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यावेळी त्याने सांगितले की वैद्यकीय उपचारासाठी तो काही काळ ब्रेक घेत आहे. त्या वेळी दत्त किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी अधिकृतपणे काहीही उघड केले नाही, परंतु चित्रपटसृष्टीतील कोमल नहता यांनी दत्तला फुफ्फुसाचा स्टेज ३ चा कर्करोग असल्याचे स्पष्ट केले.
कित्येक वेबसाईट आणि पोर्टल्स वर असे सांगण्यात येत होते की संजय दत्तला जगण्यासाठी अवघ्या सहा महिन्यांचा काळ आहे. मात्र यात कोणतंही तथ्य नव्हतं. कर्करोगाचं निदान होताच त्यानी तातडीने मुंबईत उपचार सुरू केले. अलीकडेच त्याच्या काही चाचण्या घेण्यात आल्या ज्यामध्ये असे सांगितले गेले आहे की दत्त याने कर्करोगाच्या उपचारांना चांगला प्रतिसाद दिला आहे आणि लवकरच पुन्हा कामाला सुरवात करतील.
आपल्या ट्विटर द्वारे माहिती देत संजय दत्त म्हणाला, “मागील काही आठवडे माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी खूप कठीण होते. परंतु ते म्हणतात तसं, देव सर्वात बलवान सैनिकांना सर्वात कठीण लढाया देतो. आणि आज, माझ्या मुलांच्या वाढदिवसानिमित्ताने मी त्यांना सर्वोत्कृष्ट भेट देऊ शकलो की मी या आजारावर मात करत विजयी ठरलो आहे याचा मला आनंद आहे.”
त्यानी आपल्या चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे देखील आभार व्यक्त करताना म्हटले की, “तुमच्या सर्वांच्या अतूट विश्वास आणि पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते. मी माझ्या कुटुंबाचे, मित्रांचे आणि माझ्या चाहत्यांचे आभारी आहे जे या कठीण काळात माझे सामर्थ्य आहेत. आपण मला दिलेल्या असंख्य आशीर्वादांबद्दल धन्यवाद.”
My heart is filled with gratitude as I share this news with all of you today. Thank you ???????? pic.twitter.com/81sGvWWpoe
— Sanjay Dutt (@duttsanjay) October 21, 2020