Friday, March 27, 2026
Home बॉलीवूड सोनम कपूरचे सुंदर फोटो शेअर करत अनिल कपूर यांनी लाडक्या लेकीला दिल्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

सोनम कपूरचे सुंदर फोटो शेअर करत अनिल कपूर यांनी लाडक्या लेकीला दिल्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

आज (९ जून) अभिनेत्री सोनम कपूर तिचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. आजच्या दिवशी तिला कलाकार, फॅन्स सर्वच भरभरून शुभेच्छा देताना दिसत आहे. सोनम लवकरच आई होणार असल्यामुळे हा वाढदिवस तिच्यासाठी खूपच खास आहे. हा वाढदिवस ती सध्या लंडनमध्ये तिच्या कुटुंबासोबत साजरा करत आहे. आजच्या दिवशी तिला तिचे वडील असणाऱ्या अभिनेते अनिल कपूर यांनी देखील त्यांच्या खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

सोशल मीडियावर अनिल कपूर यांनी सोनम सोबतचे काही जुने फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी शेअर केलेल्या सोनमच्या न पाहिलेल्या फोटोंनी तिचा हा खास दिन अधिकच खास झाला आहे. या फोटोंसोबत त्यांनी एक स्पेशल न देखील तिच्यासाठी लिहिली आहे. त्यांनी लिहिलेल्या नोटमध्ये सोनम वाढदिवस साजरा करू शकत नसल्याचे देखील सांगितले आहे. तर दुसरीकडे लवकरच येणाऱ्या बाळासाठी ते सर्व किती उत्साही असल्याचे सांगितले आहे.

अनिल कपूर यांनी शेअर केलेल्या नोटमध्ये लिहिले आहे की, “सोनम कपूर यावर्षी तुझ्यासोबत तुझा वाढदिवस साजरा करू न शकण्याचे जे काही कारण आहे मात्र मला आशा आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये जेव्हा तुला भेटू तेव्हा नक्कीच आम्ही आमच्या ग्रँड चाईल्डला हातात पकडण्याच्या खूप जवळ असू. पालकत्व हे तुमच्या मुलांना आनंदी राहण्यासाठीची एक मधली कडी आहे. कारण ते तात्यांचे जीवन स्वतः घडवतात आणि दुःखी असतात कारण आपण त्यांच्या जवळ नसतो. तुम्ही लवकरच हे अनुभवाल. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आम्ही तुला आनंदला आणि येणाऱ्या बाळाला बघण्यासाठी उत्सुक आहोत.”

सध्या अनिल कपूर यांची ही पोस्ट तुफान व्हायरल होत असून, अनेक कलाकार यावर कमेंट्स करत सोनमला शुभेच्छा देत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा