सध्या मराठी चित्रपट जगतात एकापेक्षा एक दमदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या नाविण्यपूर्ण विषयांवरील चित्रपटांनी मराठी प्रेक्षक पून्हा एकदा चित्रपटांना भरभरुन प्रेम देताना दिसत आहे. सध्या चित्रपटगृहात मी वसंतराव या चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. प्रेक्षकही या चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे नाविण्यपूर्ण विषय असलेल्या या चित्रपटाचे जोरदार कौतुक होत आहे. सध्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अनिता दातेची (Anita Date) एक सोशल मीडिया पोस्ट सर्वत्र चर्चेत आहे. काय म्हणाली ती या व्हायरल पोस्टमध्ये चला जाणून घेऊ.
मी वसंतराव चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. पंडित वसंतराव देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट निपुन धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटात पंडित वसंतराव यांच्या स्वभावाचे आयुष्याचे अनेक पैलू उलघडलेले पाहायला मिळत आहेत. हा भूमिका साकारण्याचे काम अभिनेता राहुल देशपांडेने केले आहे.तर प्रसिद्ध अभिनेत्री अनिता दातेने वसंतरावांच्या आईची भूमिका साकारली आहे. चित्रपटात पुष्कराज चिरपुटकर, अमेय वाघनेही दमदार भूमिका साकारल्या आहेत. सध्या या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत असतानाच अभिनेत्री अनिता दातेच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
या व्हायरल पोस्टमध्ये अनिता दाते म्हणते की, “मी वसंतराव” हा आमचा चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला. ह्या चित्रपटात मला पंडित वसंतराव देशपांडे ह्यांच्या कणखर आई ची व्यक्तीरेखा साकारायला मिळाली. तुम्ही ह्या कामाचे, आमच्या चित्रपटाचे भरभरून कौतुक करीत आहात. तुम्हा सर्वांच्या या दिलखुलास प्रतिक्रियांसाठी मनापासून आभार.अजुनही ज्यांनी हा चित्रपट बघितलेला नाही त्यांनी नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्या पर्यंत पोहोचवा.तुमचं हे प्रेम आमचा उत्साह नेहमी वाढवत राहील.” सध्या अनिता दातेची ही पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे. याआधी अभिनेत्री माझ्या नवऱ्याची बायको मालिकेमुळे सर्वत्र चर्चेत आली होती.