व्वा!! अनिता दातेने नेसली इको तत्वाची साडी; पोस्ट शेअर करत साडी बनवणाऱ्या कामगारांचेही केले कौतुक


‘मी कुटू राहिले माझ्या नवऱ्याची बायको’ काय एवढ्यात विसरलात काय हा डायलॉग? कसे विसराल? हाच डायलॉग म्हणून राधिकाने पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. राधिका म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री अनिता दाते. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून तिने महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनावर राज्य केले आहे. तसेच एका गृहिणीपासून ते एक यशस्वी आणि जबाबदार व्यावसायिका बनून तिने प्रत्येक सामान्य स्त्रीमधील एका असामान्य शक्तीची जाणीव करून दिली होती. तिच्या मालिकेने जरी निरोप घेतला असला, तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी आजही जोडून आहे. ती अनेकवेळा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. फोटो सोबतच फोटोचे कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 

अनिताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने पोपटी रंगाची साडी आणि काळ्या रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे तसेच ज्वेलरी घातली आहे. या फोटोमध्ये ती खूपच साधी आणि सुंदर दिसत आहे. तिने कोणताही जास्त मेकअप केलेला दिसत नाहीये.

हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “प्रत्येक साडीची एक गोष्ट असते. मी नेसलेली साडी इको तत्वाची आहे. त्यांच्या टीम लक्ष्मीने तयार केलेली. विदर्भातील किमान ४० -५० शेतकरी त्यांच्या या उपक्रमाशी जोडले गेलेले आहेत. या शेतकऱ्यांना ऑरगॅनिक बियाणे देऊन कापूस उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले जाते. कापूस इको तत्व मार्केटपेक्षा अधिक किंमत देऊन विकत घेते. या संस्थेमध्ये किमान २०० महिला काम करतात. या महिलांना घरीच चरखा दिला जातो. घरातील काम सांभाळून त्या त्यांच्या वेळेनुसार चरख्यावर सुतकताई करतात. इको तत्वाचे साधारण शंभर ते दोनशे लुमज आहेत. तिथे या सुताचे कापडात रूपांतर होते. मी नेसलेली साडी केमिकल विरहित आहे. व्हेजिटेबल कलर डाय आणि हॅण्ड ब्लॉक प्रिंटने सजवली आहे. मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे ही साडी तयार करत असताना कोणत्याही इलेक्ट्रिसिटीचा वापर केलेला नाही.” (Anita date wear a eco friendly saree, share a photo on social media)

तिचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. तिचे चाहते तिच्या या फोटोवर सातत्याने कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत.

अनिता दाते हिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तिने ‘जोगवा’, ‘तुंबाड’, ‘सनई चौघडे’, ‘पोपट’, ‘अय्या’, ‘द स्मेल’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘जोगवा’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अमेरिकेला गेल्यावर प्रियांका चोप्राने विकली मुंबईमधील आलिशान संपत्ती; तब्बल ७ कोटींमध्ये झाला व्यवहार

-श्रुती हासनने केला तिच्या टाईपच्या मुलासोबत डान्स! नक्की आहे तरी कोण हा??

-दिलीप कुमारांवरून मनोज कुमार यांनी बदलले होते स्वतःचे नाव; तर देशभक्तीच्या चित्रपटांसाठी राहिले ते स्मरणात


Leave A Reply

Your email address will not be published.