सध्या मराठीत अनेक धाटणीचे चित्रपट येत आहेत. प्रेक्षकांना देखील हे सिनेमे आवडत आहेत. त्यातच आता अमृता सुभाष आणि अनिता दाते (Anita date) यांचा नवाकोरा जारण हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काळी जादू आणि कर्मकांड या विषयावर हा सिनेमा आधारित आहे. चित्रपटाची कथा, पात्र आणि कलाकारांचा अभिनय याला समीक्षकांची आणि प्रेक्षकांची भरभरून दाद मिळत आहे. या चित्रपटाचे प्रमोशन देखील जोरदार केले. या दरम्यान कलाकारांनी त्यांचे अनुभव शेअर केले आहे. अनिता दाते हिने एक भयावह अनुभव मुलाखतीत शेअर केला आहे.
यावेळी अनिता दाते म्हणाली की, “म्ही नाटकाच्या प्रयोगाला निघालो होतो. लातूरमध्ये प्रयोग होता आणि आम्हाला लातूरमधून विदर्भात जायचा होतं. रस्त्यावरून जाताना पहाटे ३: ३० वाजता एक बाई दिसली. ती रस्त्याने एकटीच चालली होती आणि ती रडत होती. त्यावेळी मी आणि माझी एक मैत्रीण ड्राइवरच्या शिटशेजारी बसलो होतो. आम्ही त्या ड्रायव्हरला म्हणालो की थांब ती बाई अशी चालली आहे. त्यावर कोणी काहीच बोललं नाही आणि गाडी पुढे नेली.”
यानंतर अनिताने एकदा चकवा लागल्याचा अनुभव देखील शेअर केला . ती म्हणाली की, “गोव्यावरून येताना आशालता वाबगावकर गाडीत होत्या. तेव्हा चकवा लागल्यासारखं झालं आणि गाडीत तिथेच फिरत होती. गोव्यातून आम्ही पुढेच जात नव्हतो. तेव्हा आशाताईंनी सगळ्यांना गाडीतून खाली उतरवले. मग आम्ही सगळे गाडीच्या समोर उभे राहिलो. त्यांनी काहीतरी मंत्र म्हटले आणि नारळ फोडला. आम्ही पुन्हा गाडीत बसलो आणि मग गाडी निघाली. त्यानंतर आणि कोकणात गेलो.” अशाप्रकारे अनिता दाते हिने तिला आलेले भयावह प्रसंग शेअर केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
या सेलिब्रिटींनी केले होते सर्वात महागडे घटस्फोट, करिश्मा कपूर-संजय कपूरचेही नाव यादीत सामील
या सेलिब्रिटींनी केले होते सर्वात महागडे घटस्फोट, करिश्मा कपूर-संजय कपूरचेही नाव यादीत सामील