Wednesday, December 3, 2025
Home अन्य Lock Upp | ‘करणवीर बोहराने मला त्याच्यासोबत संबंध…’, अंजली अरोराचा अभिनेत्याबद्दल हैराण करणारा खुलासा

Lock Upp | ‘करणवीर बोहराने मला त्याच्यासोबत संबंध…’, अंजली अरोराचा अभिनेत्याबद्दल हैराण करणारा खुलासा

कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) शो ‘लॉकअप’ची सदस्य अंजली अरोरा (Anjali Arora) हिने गुरुवारी (१० मार्च) करणवीर बोहराबाबत (Karanveer Bohra) मोठा खुलासा केला आहे. लेटेस्ट एपिसोडमध्ये मुनव्वरशी बोलत असताना अंजली म्हणाली, “करणवीर त्याच्या बायकोचा फोटो घेऊन माझ्याकडे आला आणि ‘या गेममध्ये फक्त तू आणि मी आहोत’ असं म्हणू लागला.” हे ऐकून मुनव्वरला धक्काच बसला.

अंजली पुढे म्हणते, “मी करणवीरला म्हणाले की, ‘तू काय म्हणायचा प्रयत्न करत आहेस ते मला समजत नाहीये.’ तेव्हा करण मला सांगू लागला, ‘मी तुला या शोमध्ये माझ्यासोबत संबंध ठेवण्यास सांगत आहे.'” यावर मुनव्वर म्हणतो, “काय! तू खरं बोलत आहेस का? हे खूप बालिश कृत्य आहे.” अंजली पुन्हा हसली आणि म्हणाली, “करणने मला सांगितले की आजकाल तेच विकले जाते. एकतर्फी प्रेम. माझं वय झालंय, पण तू खूप लहान आहेस. जर तू मला पसंत करण्याचं नाटक केलं, तर लोकांना ते आवडेल.” (anjali arora has claimed that karanvir bohra told her to start fake relationship because audience love it)

अंजली मुनव्वरला सांगते, “मी मग करणवीरला विचारले की, प्रेक्षकांना दाखवण्यासाठी मला काय करावे लागेल? तेव्हा करणने सांगितले की, मी त्याच्यासाठी वेडी असल्याचे दाखवायचे होते.” असं म्हणत अंजली हसायला लागली आणि पुढे म्हणाली, “मी त्याला तेव्हा होकार दिला. पण नंतर मला वाटू लागलं की, मी दिल्लीची आहे. मी असं अजिबात करू शकत नाही.” यावर मुनव्वरने विचारले की, “मला आधी का सांगितलं नाही.”

कंगणाचा हा शो चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. याच्या पुढच्या एपिसोडमध्ये काय होईल, हे पाहणं रंजक ठरेल.

दैनिक बोंबाबोंचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा :

हे देखील वाचा