Thursday, April 18, 2024

‘पावनखिंड’ सिनेमासाठी कलाकारांनी गाळला भरपूर घाम, बीटीएस व्हिडिओंमधून दिसली सर्वांची मेहनत

कोणताही सिनेमा हिट होण्यासाठी उत्तम कथा, उत्तम कलाकार, उत्तम दिग्दर्शक असण्यासोबतच आवश्यक असते. कलाकारांची त्या त्या भूमिकेसाठी घेतली जाणारी मेहनत देखील खूप मोलाचा वाटा निभावत असते. प्रत्येक कलाकार आपल्या वाटेला आलेली भूमिका पडद्यावर अधिक प्रभावी आणि जिवंत वाटावी यासाठी कठोर परिश्रम घेत असतात. जेव्हा सिनेमे ऐतिहासिक विषयावर आधारित असतात तेव्हा तर कलाकारांची मेहनत दुप्पटीने वाढते. सिनेमे प्रदर्शित होतात आणि गाजतातही मात्र त्या भूमिकेसाठी कलाकार पडद्यामागे किती मेहनत घेत असतात याचा अंदाज आपल्याला लावणेच कठीण आहे.

काही दिवसांपूर्वी मराठीमध्ये ‘पावनखिंड’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. घोडखिंड अर्थात पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे यांनी गाजवलेल्या महापराक्रमाचे अतिशय हुबेहूब चित्रण या सिनेमात दाखवण्यात आले आहे. दिगपाल लांजेकर दिग्दर्शित या सिनेमात अजय पुरकर यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची तर चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि सुपरहिट देखील झाला. आता इतक्या दिवसांनी पुन्हा सिनेमाचा विषय निघण्याचे कारण म्हणजे या सिनेमात रायाजी बांदल ही भूमिका साकारणाऱ्या अंकित मोहनने सोशल मीडियावर शेअर केलेले काही व्हिडिओ आणि फोटोज.

अंकित मोहनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या सिनेमाचे बीटीएस व्हिडिओ शेअर केले आहे. या व्हिडिओमध्ये अंकितने पावनखिंड सिनेमाचे शूटिंग कसे झाले ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, गुडघ्याभर पाण्यात अंकित उभा असून त्यावर पाण्याचा मारा केला जात आहे. अतिशय ओलाचिंब झालेला अंकित अशा स्थितीही अतिशय उत्तम पद्धतीने काम करताना दिसला. पावनखिंड सिनेमा ज्या विषयावर आधारित आहे त्या पावनखिंड जिंकण्याचा थरार भर पाऊसात झाला होता. त्यामुळे या सिनेमातही सर्व कलाकार १२ दिवस सतत पाण्याने ओले होऊन सीन देताना दिसले.

अंकितने हे व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “सर्व काही मिळवण्यासाठी त्याग करावा लागतो, सोपे काहीच नसते.” या सिनेमात अंकितला ऍक्शन सीन करताना किती मेहनत घ्यावी लागली, किती घाम गाळावा लागला याचा देखील व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. अंकित आणि त्यासोबत इतर सर्वच कलाकारांच्या अशा अविरत कष्टानेच फळ म्हणजे सिनेमाला मिळालेला घवघवीत यश.

अंकित हा अमराठी असून त्याने एमटीव्ही रोडीजच्या चौथ्या पर्वत सहभागी होत टीव्हीवर एन्ट्री मारली. त्याने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले. तो फर्जंद सिनेमात काम करून त्याने मारथीमध्ये पदार्पण केले. अंकितने आतापर्यंत महाभारत, मिले जब हम तुम, कुमकुम भाग्य आदी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा