टीव्हीचा लोकप्रिय स्टार अंकित सिवाचने (Ankit Siwach) एक खळबळजनक खुलासा केला आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मॉडेल-अभिनेता अंकित सिवाचने सांगितले की, तो कास्टिंग काउचचा बळी ठरला आहे. होय! केवळ अभिनेत्रीसोबतच नाही, तर अभिनेत्यांसोबत देखील असे प्रकार होतात. आपल्या खुलाशात अभिनेत्याने सांगितले की, त्याला कपड्यांविना फोटो मागण्यात आले होते. करिअरच्या सुरुवातीलाच अशा वाईट अनुभवाचा सामना केल्यानंतर अंकितने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णयही घेतला होता.
मागितले जायचे न्यूड फोटो
‘ये झुकी झुकी सी नजर’ने प्रसिद्ध झालेल्या अंकित सिवाचने सांगितले की, त्याला अनेकदा अशा पार्ट्यांमध्ये आमंत्रित केले जात होते, ज्यांचा त्याच्या कामाशी काहीही संबंध नाही. अंकितला तो प्रसंग आठवला, जेव्हा त्याला त्याचे न्यूड फोटो मागण्यात आले. हा प्रकार पाहून तो आश्चर्यचकित झाला. (ankit siwach opened up on the casting couch)
धक्कादायक खुलासा
दिलेल्या मुलाखतीत अंकित म्हणाला, “मला नेहमीच वाटायचं की प्रत्येक व्यक्ती चांगली असते, पण ती तुमची कमजोरी ओळखते आणि प्रत्येकाला त्याचा फायदा घ्यायचा असतो. माझ्या मॉडेलिंगच्या काळात मी या सर्व गोष्टींचा सामना केला आहे. अशीही उदाहरणे आहेत जेव्हा मला कपड्यांशिवाय माझे फोटो पाठवण्यास सांगितले गेले. मला अशा पार्ट्यांमध्ये आमंत्रित केले गेले होते, ज्यांचा कामाशी काहीही संबंध नव्हता. हा एक प्रकारचा छळ होता, ज्यासाठी मी तयार नव्हतो.”
घेतला होता इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय
अंकित सिवाचला कास्टिंग काउचसाठी भाग पाडण्यात आले नसले, तरी हे सर्व केल्यानंतरच तुम्ही तुमचा पुढचा मार्ग ठरवू शकता, असे निश्चितपणे सांगण्यात आले होते. अंकितने सांगितले की, “जेंव्हा तुम्ही जवळपास गिधाडांसारखे लोक बघता आणि ते तुम्हाला खायला तयार बसलेले दिसतात, तेव्हा सर्वांना तिथून निघून परत जावेसे वाटते.”
‘या’ शोमध्ये केलंय काम
अंकित सिवाच असे मानतो की, पावरमध्ये असलेले लोक इतरांचे शोषण करतात आणि हाच मानवी स्वभाव आहे. हे जवळजवळ प्रत्येक उद्योगात आहे आणि आपण त्यांना अजिबात टाळू शकत नाही. अशा लोकांना भेटावेच लागते.
दरम्यान, अंकित सिवाच हा मेरठचा रहिवासी आहे. सध्या तो ‘ये झुकी झुकी नजर’ या शोमध्ये दिसत आहे. याशिवाय त्याने ‘रिश्तों का चक्रव्यूह’, ‘इश्कबाज’ आणि ‘बेहद २’ सारख्या शोमध्ये काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा