Thursday, April 25, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिलावहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार जाहीर, ‘या’ ठिकाणी पार पडणार सोहळा

दिवंगत गायिका भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या नावाने दिला जाणारा लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाल्याची मोठी बातमी सध्या समोर येत आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर हा पुरस्कार दरवर्षी दिला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी या पुरस्काराचे पहिलेच मानकरी ठरणार आहेत. हा पुरस्कार सोहळा २४ एप्रिलला राजधानी मुंबईमध्ये पार पडणार आहे. ज्यामध्ये अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थित हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना दिला जाणार आहे. 

भारतरत्न लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारीला दुःखद निधन झाले होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली होती. देशातील संगीत क्षेत्रातील असामान्य व्यक्तिमत्व असणाऱ्या लता मंगेशकर यांच्या असामान्य कार्याची आणि व्यक्तिमत्वाची आठवण म्हणून हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मनोरंजन, खेळ, साहित्यिक, अशा प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यामुळे आता पहिल्यांदाच जाहीर झालेला हा पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला गेला आहे. देशाच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यांचे अनमोल योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे.

उषा मंगेशकर यांच्या हस्ते मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे २४ एप्रिलला या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्यास अनुकुलता दर्शवली आहे, अशी माहिती उषा मंगेशकरांनी दिली. नरेंद्र मोदी लतादिदींना बहिण मानतात. देशाप्रती असलेले नरेंद्र मोदींचे काम आणि सेवा बघून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याबद्दल बोलताना ह्रदयनाथ मंगेशकर यांनी १५ वर्षांपूर्वी आम्ही दिनानाथ मंगेशकर नवं हॉस्पिटल बांधलं होतं तेव्हा नरेंद्र मोदींनी या हॉस्पिटलचं उद्घाटन केलं होतं. तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. दरम्यान भाषणात लता दिदींनी, नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती, असे सांगितले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा