Monday, June 17, 2024

लग्नाच्या चर्चांमध्ये अंकिता लोखंडेला मिळाले ‘ब्राईड टू बी’ लिहिलेले खास गिफ्ट, फोटो शेअर करत मानले धन्यवाद

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध असणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या तिच्या लग्नाच्या चर्चांमुळे खूपच प्रकाशझोतात आली आहे. अंकिता लवकरच तिच्या बॉयफ्रेंड असणार्य विकी जैनसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याच्या जोरदार चर्चा इंडस्ट्रीमध्ये आणि सोशल मीडियावर चालू आहे. मात्र याबाबत अंकिताकडून कोणतीही अधिकृत माहिती आली नसली तरी तिच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून या लग्नाचा अंदाज लावला जात आहे. 

नुकतीच अंकिताने तिच्या इंस्टग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिला मिळालेल्या खास भेट्वस्तूचा फोटो शेअर केला आहे. अंकिता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. ती नेहमीच सोसहल मीडियाच्या माध्यमातून विविध गोष्टींची माहिती देत असते. सोशल मीडियावरून अंकिता नेहमीच विकीबद्दल असलेले प्रेम व्यक्त करताना दिसते. आता अंकिताने तिच्या इंस्टावर तिच्या फुटवेयरचा फोटो पोस्ट केला आहे.

Photo Courtesy: Instagram/lokhandeankita

तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये काही लेडीज सॅंडल दिसत आहे. या सॅंडलपैकी एका सॅंडलवर ‘होणारी वधु’ अर्थात ‘ब्राईड टू बी’ लिहिले असून, बॉक्सवर ‘हॅप्पी ब्राईड’ लिहिलेले दिसत आहे. शिवाय तिने तिची ही पोस्ट विकी जैनला देखील टॅग केली आहे. अंकिताची ही पोस्ट तुफान व्हायरल होत असून, या पोस्टने ती लवकरच लग्न करणार असलायची बातमी अधिकच पक्की झाली असल्याचे बोलले जात आहे.

एका मोठ्या वृत्तपत्राच्या माहितीनुसार अंकिता आणि विकी १२ ते १४ डिसेंबर दरम्यान लग्न करणार आहे. या लग्नाच्या बातम्यांमुळे अंकिताचे फॅन्स खूपच आनंदित आणि उत्साहित झाले आहे. तशा स्वरूपाच्या कमेंट्स देखील ते अंकिताच्या पोस्टवर करत आहे. अंकिताने काही दिवसांपूर्वीच तिचे आणि विकीचे काही फोटो, व्हिडिओ पोस्ट केले होते.

अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून मनोरंजनविश्वात पदार्पण केले. तिला पहिल्याच मालिकेतून अमाप लोकप्रियता मिळाली. या मालिकेत असणारी तिची आणि सुशांत सिंग राजपूतची जोडी खूप लोकप्रिय झाली. हे दोघं खऱ्या आयुष्यातही एकमेकांना डेट करत होते. मात्र त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर तिने विकी जैनला डेट करायला सुरुवात केली. मागील तीन वर्षांपासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

शूटिंगच्या सेटवरच जिवंत जळाली होती ‘ही’ अभिनेत्री, वाचा एका माचिसच्या काडीने कसा घेतला जीव

अल्लू अर्जुन अडकला अडचणीत, अपमानकारक जाहिरातीमुळे तेलंगणा सरकार पाठवणार नोटीस

ट्रान्सजेंडरची भूमिका निभावून मिळवली ओळख, पहिल्याच भेटीतच आशुतोष राणांच्या नजरेत भरली होती रेणुका शहाणे

हे देखील वाचा