Saturday, April 19, 2025
Home कॅलेंडर ANKITA@36 : सुशांतच्या मृत्यूचा सल मनात ठेवून अंकिताने साजरा केला वाढदिवस, व्हिडिओ आला समोर

ANKITA@36 : सुशांतच्या मृत्यूचा सल मनात ठेवून अंकिताने साजरा केला वाढदिवस, व्हिडिओ आला समोर

हॅप्पी बर्थडे अंकिता! अंकिता लोखंडे हीने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. सर्वांची लाडकी अभिनेत्री अंकिता  ३६ वर्षांची झाली. तिच्या आतापर्यंतच्या करियरमध्ये आणि वैयक्तिक आयुष्यात तिने अनेक चढउतार पाहिले आहेत. विशेषतः यावर्षी जरा जास्तच!

तिचा आधीचा प्रियकर आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपुत याने आत्महत्या केली आणि याचा परिणाम तिच्यावर देखील झाला. कारण, २०१६ मध्ये जरी दोघांचा ब्रेकअप झाला होता तरीसुद्धा ते दोघेही एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स होते. आपण तिच्या याच आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत.

अंकिता लोखंडे हे नाव दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या बरोबरच प्रसिद्ध झालं. दोघांनीही २००९ साली आलेल्या पवित्र रिश्ता या मालिकेमधून मालिकाविश्वात पदार्पण केलं. आणि या दोघांचीही जोडी फार कमी वेळात प्रसिद्ध झाली.

पडद्यावर नवरा-बायको साकारताना अंकिता आणि सुशांत रिअल लाईफमध्ये देखील एक कपल झाले होते. साधारण वर्षभराने सुशांतने बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी ही मालिका सोडली, तसेच मालिका क्षेत्रालाच कायमचा रामराम ठोकला.

त्यावेळी दोघेही एकत्र लिव्ह इन मध्ये राहत होते. अंकिताने पवित्र रिश्ता संपेपर्यंत म्हणजे २०१४ पर्यंत ही मालिका केली. या नंतर तिने इतरही काही मालिकांमध्ये काम केलं आणि महत्त्वाच्या भूमिका बजावल्या.

सुशांत आणि अंकिताने एकत्र झलक दिखला जा या डान्स रिऍलिटी शो मध्ये भाग घेतला. यानंतर २०१६ मध्ये सुशांत आणि अंकिता काही कारणास्तव वेगळे झाले. वेगळे झाले परंतु त्यांनी त्यांची मैत्री तुटू दिली नाही.

अंकिता ही मालिका विश्वातली सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री होती. २०१८ मध्ये अंकिताने देखील बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी मालिकविश्वातून निवृत्तीची घोषणा केली. यानंतर तिने २०१९ मध्ये आलेल्या कंगना रनौतच्या मणिकर्णीका या सिनेमामधून बॉलिवूडमध्ये यशस्वीरीत्या पदार्पण केलं होतं.

त्यानंतर बाघी-३ मध्ये ती झळकली होती. शिवाय यावर्षी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येऊ घातलेल्या संजय दत्त स्टारर टोरबाझ या सिनेमात देखील ती महत्त्वाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे.

सुशांतसोबत इतक्या दीर्घकाळ असलेल्या नात्याचा शेवट झाल्यानंतर अंकिता काही काळ एकटीच होती. सुशांत रिया चक्रवर्ती सोबत नात्यात आला होता, तर अंकिताला देखील विकी जैनच्या रुपात तिला तिचं दुसरं प्रेम मिळालं. विकी हा पेश्याने व्यावसायिक आहे. माध्यमांनुसार विकी आणि अंकिता हे दोघेही पुढील वर्षी लग्न करून संसार थाटू शकतात.

हे देखील वाचा