Tuesday, April 8, 2025
Home अन्य ‘अपना टाइम आयेगा’ गाण्यावर अंकिता लोखंडेने केला जबरदस्त डान्स; पाहायला मिळाला अभिनेत्रीचा ‘स्वॅग’

‘अपना टाइम आयेगा’ गाण्यावर अंकिता लोखंडेने केला जबरदस्त डान्स; पाहायला मिळाला अभिनेत्रीचा ‘स्वॅग’

टेलिव्हिजनपासून ते बॉलिवूडपर्यँतचा टप्पा पार करण्यास कलाकरांना खूप कालावधी लागतो. त्यासाठी त्यांना खूप परिश्रम घ्यावे लागतात. पण एकाच मालिकेने यशाचे शिखर गाठून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत अर्चना हे पात्र निभावून घराघरात पोहचणारी अंकिता या मालिकेत जेवढी साधी आणि सोज्वळ होती, तेवढीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात ती ग्लॅमरस आणि मस्तीखोर आहे. तिने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिची मस्ती पाहायला मिळत आहे.

अंकिताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती मस्तीच्या अंदाजात डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘अपना टाइम आयेगा’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिने ग्रे कलरचे जॅकेट, तसेच ग्रे कलरचे शॉर्ट्स घातले आहे. तिने पायात पांढऱ्या रंगाचे शूज घातले आहे. तसेच डोळ्यांवर चष्मा घातला आहे. ती अत्यंत मजेशीर अंदाजात डान्स करत आहे. तिचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. सगळेजण कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. यावर अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने कमेंट केली आहे की, “मी कुठे होते?” तर प्रार्थना बेहेरेनी कमेंट केली आहे की, “लव्ह यू वेडे.” तिचा हा अंदाज सर्वांनाच खूप आवडला आहे.

अर्चना लोखंडेची ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका पुन्हा एकदा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पवित्र रिश्ता २.०’ ची शूटिंग चालू झाली आहे. याची माहिती अंकिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली होती. या मालिकेच्या पहिल्या भागात मानवच्या भूमिकेत बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने काम केले होते. त्याची ही भूमिका चांगलीच गाजली होती. यानंतर त्याने अनेक चित्रपटात काम केले होते. आता या मालिकेत मानवच्या भूमिकेत अभिनेता शाहीर शेख दिसणार आहे. तसेच अभिनेत्री अभिज्ञा भावे देखील दिसणार आहे.

अंकिताच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘मनिकर्णिका‌’ या चित्रपटात काम केले. तसेच ती ‘बागी ३’ मध्ये देखील दिसली होती. या चित्रपटात तिने श्रध्दा कपूर, टायगर श्रॉफ, रितेश देशमुखसोबत काम केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जिया खान आत्महत्या प्रकरणाची धुरा विशेष सीबीआयच्या हातात; सूरज पांचोली म्हणाला, ‘…मला शिक्षा झालीच पाहिजे’

-करिश्मासोबत नाते तोडून अभिषेकने का केले तीन वर्षांनी मोठी असणाऱ्या ऐश्वर्यासोबत लग्न? कारण ऐकून व्हाल हैराण

-लाजुन लाल झाला शाहिद कपूर, जेव्हा मीराने शेअर केले बेडरूम सिक्रेट; म्हणाली, ‘मला वाटतं तो कंट्रोल…’

हे देखील वाचा