Friday, November 22, 2024
Home टेलिव्हिजन ना विक्की ना सासर अंकिताने आजी अन् आईसोबत साजरा केला व्हॅलेंटाईन डे; घटस्फोटाच्या चर्चेला उधाण

ना विक्की ना सासर अंकिताने आजी अन् आईसोबत साजरा केला व्हॅलेंटाईन डे; घटस्फोटाच्या चर्चेला उधाण

जगभरात काल मोठ्या उत्साहात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला. अनेक सेलेब्सनी कपल फोटो शेअर करत एकमेकांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita lokhande) वेगळ्याच दुनियेत पाहायला मिळाली. अंकिताने व्हॅलेंटाईन डे विक्कीसोबत साजरा न करता एकटीनेच साजरा केल्याचे पाहायला मिळाले. तर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये अंकिता आपल्या आईच्या परिवारासोबत दिसली. त्यामुळे बी टाऊनमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. दोघांच्या नात्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

बिग बॉस सीझन १७ अंकिता आणि तिचा पती विक्की जैन यांनी चांगलाच गाजवला. यावेळी दोघांमध्ये अनेक मोठे वाद पाहायला मिळाले. बिग बॉसच्या घरातील त्यांचे वाद पाहता सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली होता. मात्र, ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर सगळं काही आलबेल असल्याचं अंकिताने सांगितलं होतं. एकमेकांचे फोटो शेअर करत अंकिताने चाहत्यांना दिलासा दिला होता. मात्र, व्हॅलेंटाईन डेला एकटीत केक कट करताना आणि माहेरच्यांसोबत दिसल्याने पुन्हा एकदा त्यांच्या नात्यासंदर्भात चर्चेने जोर धरला आहे.

अंकिताने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती सगळ्यांना व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. तिच्या हातात कप केकही दिसत आहेत. पण, त्या व्हिडिओत विकी मात्र कुठेच दिसत नाही. या व्हिडिओत अंकिता म्हणते, “व्हॅलेंटाइन डे स्पेशल बनवण्यासाठी रेड वेलव्हेट कपकेक…मी बिग बॉसच्या घरात सगळ्यात जास्त याच गोष्टीला मिस केलं. विक्की नसला तरी कपकेक खाऊन मी व्हॅलेंटाइन दिवस साजरा करेन.” यावेळी अंकिता गुलाबी रंगाच्या डेनिम आऊटफिटमध्ये दिसली.

तर दुसऱ्या एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अंकिता आपल्या आईच्या परिवारासोबत दिसली. यावेळी तिनं पापाराझीशी बोलताना ‘माझा व्हॅलेंटाईन माझी आझी आहे. माझ्यासोबत माझी आई मावशी काकी’ इतके लोक आहेत. अस तिनं सांगितलं.

अंकिताच्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. तिच्या या दोन्ही व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तर काही युजर्स तिला ट्रोल करत आहेत. अंकिता विक्की यांनी बिग बॉसच्या घरात असताना एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसले होते. त्यामुळे दोघांमध्ये पुन्हा दुरावा आल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. अंकिता आणि विकीने २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली होती. विकी एक व्यावसायिक आहे. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करताना दिसतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

पब्लिक स्टंट पडला चांगलाच भारी, पूनम पांडेवर 100 कोटींचा मानहानीचा गुन्हा दाखल
शिवरायांचा छावा १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात होणार प्रदर्शित, वाचा सविस्तर

हे देखील वाचा